Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

नितीन आगे खून खटला विशेष सरकारी वकीलांची खटल्यातून माघार

 


नितीन आगे खून खटला
विशेष सरकारी वकीलांची खटल्यातून माघार


अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा या गावात नितीन आगे यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर आंबेडकरी जनतेनेच्या आंदोलनांनी संबंध महाराष्ट्र ढवळून निघाला होता मा.अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात साक्षीदार फितुर झाल्याने सर्व आरोपी निर्दोष झाले होते.आंबेडकरी जनतेच्या रेट्याने शासनाने मा.औरंगाबाद उच्च न्यायालय खंडपीठात अपील दाखल केले होते तसेच फितूर साक्षीदारांवर कारवाई करण्याचा खटला अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात प्रलंबित आहे.शासनाने या खटल्यात मा.औरंगाबाद उच्च न्यायालय खंडपीठात कक्रिमिनल ऍप्लिकेशन क्रमांक 7226/2017 अपिलामध्ये शासनाची बाजू प्रभावी मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील मा.उमेशचंद्र यादव पाटील साहेब यांच्या संमतीपत्रानंतरच गृह विभागाच्या दिनांक 15 सप्टेंबर 2018 रोजी नियुक्ती केली होती हा खटला सुनावणीस येताच शासनाने नियुक्त केलेल्या विशेष सरकारी वकिलांनी काही कारणास्तव माघार घेतली आहे.तसे पत्र त्यांनी स्वतः शासनाच्या गृह विभागास पाठवून  एक प्रत राजू आगे यांना पाठवली आहे.त्यामुळे राजू आगे हे पुन्हा चिंतातुर झाले आहेत.
हे अपील प्रथम स्टेजवर आहे.महाराष्ट्र शासनाने याची गंभीर दखल घेऊन तात्काळ विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करावी अन्यथा मागील दिवस पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही हा खटला महत्वपूर्ण व संवेदनशील तर आहेच शिवाय आंबेडकरी जनतेच्या भावना यामध्ये गुंतल्या आहेत पुढील सुनावणी 12 मार्च 2020 ला मा.उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे होणार असल्याचे सांगण्याात आले आहे.


Previous Post Next Post