लातूर मध्ये अवैध दारू विकणाऱ्या सायली पान टपरी वर पोलीस प्रशासनाने मारली धाड
एलआयसी ऑफिस च्या शेजारील सायली पान टपरी वरती विक्री केली जात होती देशी दारू
लातूर शहरामध्ये सध्या जिल्हाधिकारी यांनी 21 व 22 या दोन्ही दिवशी सर्व दूकाने व दारू दुकाने बंद राहतील याबाबतचे आदेश काढले होते, परंतू त्याची पायमल्ली पहिल्याच दिवशी झाली.
लातूर शहरातल्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत जुना रेणापूर नाका एलआयसी ऑफिस च्या शेजारी एका पानपट्टी वरती देशी दारू चढ्या भावाने सर्रास विकली जात होती, मात्र या गोष्टीची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पोलिस निरिक्षक लाकाळ साहेब व त्यांची टीम घटनास्थळी पोहोचून अवैध दारू विक्री करणाऱ्याला रंगे हात पकडून देशी दारूचे चार बॉक्स जप्त केले आहेत.
पहिल्याच दिवशी कायद्याचे तिनतेरा झाले असून.अवैध धंदेवाले सक्रीय झाले असल्याचे यावरून दिसून येत आहे.पूढील 10दिवस नेमके पोलीस प्रशासन कसे लक्ष ठेवणार ?याकडे आता लातूर च्या जनतेचे लक्ष लागले आहे,पुढील कारवाई शिवाजी नगर पोलिस स्टेशन करत आहे