सॅनिटायझर व मास्क रेशन दुकानातून देण्याची मागणी
शहर भाजपाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
लातूर /प्रतिनिधी :कोरोना या आजारापासून बचाव करण्यासाठी शासनाने सॅनिटायझर व मास्क ही महागडी साधने रेशन दुकानातून उपलब्ध करून द्यावीत ,अशी मागणी भाजपाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. सॅनिटायझर व मास्क या दोन्ही वस्तू खरेदी करणे गोरगरिबांना अशक्य आहे ,त्यांना परवडणारे नाही .त्यामुळे शासनाने या दोन्ही वस्तू रेशन दुकानातून उपलब्ध करून दिल्या तर अशा कुटुंबियांचा आजारापासून बचाव होऊ शकतो असेही या निवेदनात म्हटले आहे. उत्तर प्रदेश सरकारने हातावर पोट भरणारे कामगार, घरकाम करणाऱ्या महिला, घरगडी ,हमाल, भाजीविक्रेते अशांसाठी आर्थिक नियोजन म्हणून त्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याचा निर्णय घेतला आहे .महाराष्ट्र सरकारनेही असा निर्णय घेऊन त्यासाठीची आर्थिक तरतूद करावी. खात्यावर तात्काळ पैसे जमा करावेत आदी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत . देशात कोरोना चा प्रादुर्भाव थांबण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात उपाययोजना केल्या जात आहेत. त्या अनुषंगाने निवेदनात करण्यात आलेल्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी तात्काळ निर्णय घेऊन आदेश काढावेत अशी मागणी करण्यात
आली आहे .जिल्हाधिकाऱ्यांना भेटलेल्या शिष्टमंडळात शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे यांच्यासह .... आदींचा समावेश होता
Tags:
LATUR