पत्रकारांना मिळाला न्याय
गरीब मुलींचे पैसेही मिळाले परत
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ(रजि) महाराष्ट्र राज्य या संघटनेचे सर्वत्र अभिनंदन* !
संस्थापक अध्यक्ष आंबेगावे डी.टी. यांनी केला होता पाठपुरावा
*पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत आरोपींवर गुन्हा दाखल
*आरोपींना ठोकल्या बेड्या
पुणे- पुणे येथील एका कंपनीने मुलीला जाॅब देतो म्हणून पैसे उकळले होते, तीन दिवस झाल्यानंतर त्या कंपनीने सदर मुलीस आणखी पैसे आणण्यास सांगितले होते ती गरीब मुलगी पैसे आणू शकत नव्हती, हा सर्व प्रकार पत्रकार पंढरी गायकवाड यांना समाजताच ते सदर कंपनीत जाऊन चौकशी करत असतांना कंपनीच्या कर्मचा- यांकडून पत्रकार पंढरी गायकवाड यांना दि 18/3/2020 रोजी मारहाण केली होती पण पंढरी गायकवाड पोलिस स्टेशनला गेले असता त्यांची पत्रकार म्हणून तक्रार नोंदवून घेतली गेली नव्हती त्यानंतर पत्रकार गायकवाड( मो न 9112224949 ) यांनी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ(रजि) महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आंबेगावे डी.टी.यांना घडलेला प्रकार सांगितला व रात्री उशिरा आंबेगावे डी. टी.यांनी सदर पोलिस स्टेशनच्या अधिका-यास फोन लावला असता फोन लागला नसल्याने दि 19/3/2020 रोजी पोलिस स्टेशनला फोन लाऊन सदर कंपनीच्या कर्मचा-यांची चौकशी करा, पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत आरोपींवर गुन्हा दाखल करायला सांगितले होते त्याप्रमाणे पोलिस स्टेशनने पुढे कार्यवाही करून सदर कंपनीचे मालक व कर्मचारी यांना ताब्यात घेतले असून आरोपीवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व सदर मुलींचे पैसेही परत देण्यात आले आहेत त्यामुळे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ(रजि) महाराष्ट्र राज्य या संघटनेचे सर्वत्र कौतुक होत आहे.