Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

तहसील कार्यालयात अव्वल कारकूनाचा उद्धटपणा...

 


तहसील कार्यालयात अव्वल कारकूनाचा उद्धटपणा...


औसा प्रतिनिधी /-औसा तहसील कार्यालयातील कर्मचारी कामात टाळाटाळ करीत असून नागरिकांशी अरेरावीची एकेरीवार उद्धटपणाची भाषा वापरीत कामासाठी येणार्‍यांना अपमानीत करीत असल्याचा प्रकार घडला आहे. याबाबतची माहिती अशी की, औसा तहसील कार्यालयाचे अव्वल कारकून संपत माने हे कामानिमित्त येणाऱ्याशी उद्धट वर्तन करीत असल्याची तक्रार जिल्हाधिकारी लातूर यांच्याकडे दिले आहे. दि. 13 मार्च रोजी ऐपतदार प्रमाणपत्र बाबत विचारणा करण्यासाठी सायं. 5 : 45 वाजता गेले असता कामकाजाची वेळ संपली आहे. सोमवारी ये मला एवढेच काम आहे काय ? असे म्हणत उद्धटपणाची भाषा वापरून तहसील कार्यालयाच्या बाहेर हाकलून दिले, असल्याची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात आली आहे. सदर तक्रार अर्जाची चौकशी करून अव्वल कारकून संपत माने यांना निलंबीत करावे अशी मागणी अजित दयानंद शिंदे, प्रशांत बसवंत बिडवे, रविकांत विलास पाटील, महेश रामचंद्र शिंदे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.


Previous Post Next Post