Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

औसा-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचे काम अपूर्ण,कंत्राटदाराकडून टोल वसुली मात्र सुरु

 


औसा-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचे काम अपूर्ण,कंत्राटदाराकडून टोल वसुली मात्र  सुरु


टोलची रिटर्न  बंदच्या नावने ग्राहकांची लूट




काम पूर्ण न करता राजरोस सुरु असलेल्या आशिव - लामजन्या दरम्यानच्या टोलवरुन प्रवासी वाहनांना पुढील प्रवास करुन परत येण्याच्या सवलतीचे असलेली रिटर्न व्यवस्था बंद असल्याचे सांगूण येथील टोलवरुन ग्राहकांची मोठ्या प्रमाणात लूट केली जात आहे. कारण एका वाहनासाठी या रोडवरुन जाण्यासाठी एका बाजूने जाताना ९० रुपये घेतले जात असतील तर तोच दर रिटर्नसाठी १२० रुपये आकारला जातो. या सवलतीमुळे तात्काळ काम करुन परत येणार्‍या वाहन धारकास ९०+९१= १८० च्या ऐवजी १२० म्हणजे ग्राहकांना तब्बल ६० रुपयांची सुट मिळत असते. परंतू येथे ही व्यवस्था बंद असल्याचे सांगून या परिसरातील थोड्या थोडक्या कामासाठी शेजारच्या गावात जाणार्‍या लोकांना याचा मोठा फटका बसत आहे. याबाबची संबंधीत प्रशासनाकडे तक्रार करुन सुध्दा संबंधीतांवर नियंत्रण किंवा कारवाई केली जात नाही. त्यामुळे या भागातील प्रवाश्यांना आपल्या स्वतःच्या वाहनांपेक्षा इतर वाहनांनेच प्रवास करणे हाच पर्याय उरला आहे.


औसा / प्रतिनिधी ः देशाच्या प्रगतीसाठी शरिरातील रक्तवाहिनी प्रमाणे काम करणारे देशातील रस्ते आपली भूमिका बजावत असतात. हिच बाब लक्षात घेऊन मोदी सरकारने देशातील सर्वच राष्ट्रीय महामार्गांचे काम अतिशय प्रागतिक स्वरुपात सुरु केलेले आहे. परंतू याच योजने अंतर्गत तुळजापूर पासून औशापर्यंत नव्याने झालेल्या या राष्ट्रीय महामार्गावरील अनेक ठिकाणचे कामे अपूर्ण आहेत. परंतू काम पूर्ण झाल्यानंतर टोल वसुलीची सुरु होणारी प्रक्रिया संबंधीत कंत्राटदाराकडून काम अपूर्ण असतानाच सुरु करण्यात आलेली आहे. यामुळे संबंधीत प्रकरणी या परिसरातील व या रस्त्यावरुन वाहतूक करणार्‍या प्रवाशातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
देशात पंतप्रधान राष्ट्रीय महामार्ग विकास योजना असो की, अन्य विकास योजनांच्या माध्यमातून सध्या देशात मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय महामार्ग विकासाच्या माध्यमातून अतिशय दर्जेदार राष्ट्रीय महामार्ग विकसीत केलेले जात आहेत. हे करत असताना संबधीत विकासकाला यावर केलेल्या खर्चाचा भरना करण्यासाठी काम पूर्ण झाल्यानंतर त्या राष्ट्रीय महामार्गावर टोल उभारुन याच माध्यमातून त्यांचा खर्च वसुलीच्या तरतूदी करण्यात आलेल्या आहेत. यानुसार देशात दररोज किमान १०-१५ कि.मी. राष्ट्रीय महामार्गाचे काम विकसकांकडून सुरु आहे. यावर शासकीय यंत्रणेनांचे नियंत्रण आहेच. त्याशिवाय संबंधीत विकासकाचेही बारकाव्याने लक्ष असल्याने हे रस्ते दर्जेदार आणि अतिशय टिकावू बनवले जात असल्याचे पाहवयास मिळत आहे. 
याच योजनेअंतर्गत लातूर जिल्ह्यातून तुळजापूर- औसा, लातूर मार्गे नागपूरकडे जाणारा राष्ट्रीय महामार्गाचे काम अतिशय वेगाने सुरु आहे. परंतू या कामाच्या विकासकडून मात्र संबंधीत काम पूर्ण होण्या अगोदरच किंवा तत्पूर्वी हे काम पूर्णत्वास येऊन त्याचा रितसर लोकार्पण होण्यापूर्वीच वापरास खुले करण्यात आलेले आहेत. त्याशिवाय बर्‍याच ठिकाणी हे रस्ते व रस्त्यावरील पूल अर्धवट बांधण्यात आलेले आहेत. असे असतानाही संबंधीत विकासाकडून या कामाच्या मोबदल्यात टोल वसुली अतिशय जाचक पध्दतीने सुरु करण्यात आलेली आहे. कारण औसा - तुळजापूर महामार्गावरच्या आशिव जवळच्या टोलनाक्यावर जोमात टोल वसुली केली जात आहे परंतू या टोलनाक्यावरुन टोल वसुली पूर्वी करावयाच्या परिपूर्ण कामाचा आढावा न घेता किंवा याच रस्त्यावरच्या काक्रंबा गावाजवळील रस्त्याला ओलांडण्यासाठीचा पूल अर्धवट अवस्तेत असताना ही या टोल नाक्यावरुन टोल वसुलीचे काम केले जात आहे. याकडे संबंधीत विभागाच्या अधिकाराचे अर्थपूर्ण दूर्लक्ष असल्याचे ही बोलले जात आहे.
रस्ते विकास महामंडळ आणि महामार्ग विकास यंत्रणांच्या संबंधीत यंत्रणो या प्रकरणाकडे अर्थपूर्ण दूर्लक्ष असल्याचे पाहून या परिसरातील विविध संघटनांचे नेते, कार्यकर्ते आणि विविध पक्षाचे पदाधिकारी मात्र आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे या परिसरातून लक्षात येत आहे.



Previous Post Next Post