लातुर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष नरसिंह घोणे, यांना पोलिसांकडून मारहाण तर जाब विचारणार्या संपादकाला दिली धमकी
__(पत्रकराने केला जाहीर निषेध )
लातूर :.........
काल सकाळी शिवाजी चौकात जिल्हाध्यक्ष नरसिंह घोणे यांना पोलिसांकडून मारहाण झाली आहे, मात्र dysp-सचिन सांगळे सारखा जवाबदार व्यक्ती तिथे असतानाहि असे प्रकार घडत आहेत त्यामुळे पोलिसांच्या अश्या वागण्याचा सर्वत्र निषेधकेला जात आहे . संचारबंदीचा असा गैरफायदा पोलीस घेणार असतील तर मग पत्रकार,कार्यकर्ते आणि लोकांनी पोलिस महोदयांना कोणत्या भाषेत लोकशाहीतली संचारबंदी शिकवायची..श्री घोणे, पत्रकार संघाचे अध्यक्ष आहेत, शिवाय त्यांच्याकडचे शासकीय अधिस्वीकृती ओळख पत्र आहे ते दाखवत आसताना त्यांना मारहाण करण्यात आली. हे अत्यंत चुकिचे व बेजबाबदार वागने आहे ,यावर फोटो क्राईम चे संपादक विष्णु आष्टीकर यांनी मारहाणी संदर्भात dysp सांगळे यांना विचारना केली असता आर्वाच्य भाषेत बोलून पून्हा फोन केला तर गून्हादाखल करिन,अशी धमकीवजा भाषा वापरली. केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यानी ज़ाहिर केल आहे पत्रकार ला पोलीस त्रास देत असतील तर संचार बंदीच्या काळात त्यांच्या वर कारवाई केली जाईल. एवढे माहीत आसुन सुधा: पोलिस गांभीर्याने घेत नाहीत . सामान्य माणूस व प्रेस चा माणूस एवढे सुध्दा पाहत नाहीत . लोकशाही च्या चौथ्या स्थंभावर आसा अन्यय होत आसेल तर जिल्यातील सर्व पत्रकार या विरुध्द आवाज उठवले शिवाय राहणार नाहीत.असे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे अध्यक्ष अंबेगावे डि टी यांनी सांगीतले आहे.