Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

तपसे चिंचोलीत, नांदेडच्या विश्वकर्मा शैक्षणिक विकास संस्थेचा जनजागृती उपक्रम

 


तपसे चिंचोलीत ,नांदेडच्या  विश्वकर्मा शैक्षणिक विकास संस्थेचा जनजागृती उपक्रम


प्रतिनिधी:- 
 जगात कोरोना संसर्गजन्य रोगाचा सध्या धुमाकूळ सुरू असून प्रशासनाच्या वतीने योग्य खबरदारी घेऊन जनजागृती करण्यात येत आहे.
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::
 अशातच आता प्रशासनाला हातभार लागावा म्हणून सामजिक संस्था पुढाकार घेत असून विष्णुपुरी नांदेड येथील विश्वकर्मा शैक्षणिक विकास संस्थेतर्फे 
दिनांक २८ मार्च २०२० रोजी  औसा तालुक्यातील तपसे चिंचोली येथे विश्वकर्मा शैक्षणिक विकास संस्थेतर्फे कोरोना बाबत जनजागृती करत  मोफत मास्क व सॅनिटायझेशन करण्यात आले.


राज्यासह देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव होत असताना त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून तोंडाला मास्क लावणे, वेळोवेळी हात धुवणे यासारखी दक्षता घ्यावी असे शासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे.मात्र ग्रामीण भागातील लोकामध्ये  कोरोना बद्दल जनजागृती  ,आणि संसर्ग टाळावा  यासाठी विष्णुपुरी नांदेड येथील विश्वकर्मा शैक्षणिक विकास संस्थेचे अध्यक्ष डॉ दिगांबर नेटके आणि शशिकांत वाघमारे यांच्या सहकार्याने विश्वकर्मा संस्थेच्या  तरुण कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन दिनांक २८ मार्च २०२० रोजी  जनजागृती केली व  गावातील गरजू लोकांना  सॅनिटायझेशन करून मास्क वाटप करण्यात आले.तसेच दिवसांतून दोन तीन वेळा हात साबणाने स्वच्छ धुवा  तोंडाला मास्क लावा ,विनाकारण गर्दी करू नका,प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करून जनजागृती करण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य महेश पाटील,गावचे उपसरपंच सोमेश पाटील, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य संघटनेचे राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे,
 पोलीस पाटील दत्तात्रय पाटील,माजी सरपंच मारुती नेटके,संदीप मोरे,खंडू नेटके, प्रवीण नेटके, गणेश नेटके,दिगंबर शिंदे ,प्रशांत नेटके आदी उपस्थित होते.


Previous Post Next Post