Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

दिवसाच्या बाळाला घेवून दिली परीक्षा-महिला दिन विशेष

 


दिवसाच्या बाळाला घेवून दिली परीक्षा-महिला दिन विशेष


लातूर ः जागतिक महिला दिन साजरा होत असतांना महिलेने संकटावर मात केली. महिला सशक्त आहे, प्रत्येक शेत्रात अग्रेसर आहे त्यापैकी काहींनी आपापल्या परीने जगाच्या उच्चस्थानी तर काहिंनी गावपातळीवर यश व पद संपादन केलेले आहे. त्यापैकी तुमचाही महिला म्हणून गौरव करणे हा छोटेखाणी प्रयत्न होय.
अंबाजोगाई येथील प्रा. नाजेमा अब्बास शेख  जन्म   5 मार्च 1970  रोजी झाला. आजोबा माजी सैनिक असल्याने राष्ट्रीय प्रेम व देशप्रेम धाडस घरातच होते  तर  वडील शिक्षक (इस्लामीक धार्मिक) तर आई (गृहणी) तीनभाऊ (व्यापारी), तीन बहिनी,(गृहणी) मोठ्या कुटुंबात असतांना प्राथमिक, माध्यमिक, अंबाजोगाई तर उच्च माध्यमिक बीड येथे (एम.ए.बी.एड विषेश प्राविण्यासह उत्तीर्ण) शिक्षणाची सुरवातीपासून आवड होती. सासरी कोणीही शिकलेले नाही पण शैक्षणिक घराण्यातल्या असल्याने शिक्षणाची कास सोडली नाही. विवाहानंतरही शिक्षण चालूच ठेवले. मुस्लीम समाजात मुलींना शिकवणे म्हणजे कठीणच होते पण तुम्ही शिकलात हे नाकारता येणार नाही.
औसा येथील हिन्दुस्तान एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक शिक्षण सम्राट स्व. एन. बी. शेख यांच्या शिक्षण संस्थेअंतर्गत (रूकय्या बेगम  लातुरातील न्यू काझी मोहल्ला) येथे  शिक्षिका म्हणून कार्यरत  आहात. ज्यामध्ये प्राचार्य,मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक, (मराठी/ऊर्दु माध्यम) पालक, यांच्या सहकार्याने शिक्षणातून शैक्षणिक व समाजजागृती करत आहात हे खरच कौतुकास्पद व विशेष अभिनंदनीय आहे. स्वभावाने शांत व मनमिळावु  हाच साधेपण आपल्यात दिसून येतो. शैक्षणिक, गुणवत्तेवर भर देतात, भाषण, कला, वक्तृत्त्व, संस्कृति यावरही आपला विशेष हातकंडा आहे.
गृहिणी म्हणून आलेल्या संकटावर मात करून  तुम्ही मुलाला अभियंता  तर मुलीला वैज्ञकीय  क्षेत्रात घडवत आहात तर पती हे दि. उदगीर बँकेत  नोकरीस आहेत. ते ही प्रा. वहिदाभाभी यांच्या मुस्लिम विकास परिषद संघटनेच्या माध्यमातून  मुस्लिमांना शिष्यवृती व आरक्षण या लढयात  सन 2000 सालापासून कार्यरत आहेत. पत्रकारिता, समाजकार्यासह लेखणीच्या माध्यमातून समाजजागृती करण्याचे कार्य करत आहेत, त्यात तुमचाही सिंहाचा वाटा आहे.
मुस्लिम समाजात शिक्षणाची जागृती करणे हाच एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून साधारण जीवन जगत असतांना उच्च विचार हे तुमच्या कुटुंबात दिसून येतात हे नाकारता येणार नाही.   मुस्लीम समाज शिक्षणापासून वंचित आहे याची जाण ठेवून जीवन जगत आहात. तसे पाहता मला ते दिवस आजही आठवत गृहिणी  घरसंसाराला पावलो पावली संभाळून घेतलात.  कधीच कोणत्याही गोष्ठीचा हट्ट नाही.. कधीही तक्रार नाही की वाद नाही हाच तुमचा स्वभाव माझ्या सारख्या मैत्रीणीला भारावुन टाकतोय,  तुमचे बाळ अब्दुल अहद समद हा अवघा 09 दिवसांचे बाळ होते तशा स्थितीत परीक्षा दिलात हे कौतुकास्पद होय. कधीच याचा कुणाजवळ गाजावाजा केला नाही किंवा कोणा विषयी कुणाची कोणाकडे  तक्रार नाही. घरसंसारात व धार्मिक वृत्ती ही सुरवातीपासूनच अंगी आहे. त्रास झाला, होतोय याची साधी वाच्यताही केलात असे दिसत नाही. शांत स्वभाव सह  कधी कोणालाही न दुखवता सहनशीलतेने समोरच्याला आपण आधार  देतात  घर, नौकरी, कुटुंब संभाळतात जीवनाची कसरत करताहेत. कधी कोणाशी वाद नाही. आलेल्या संकटाला स्थिरता देवून मार्ग काढतात. इस्लाम संस्कृती जपत जे करावयाचे ते बंद मुठ्ठी एका हाताने केलेली मदत दुसर्‍या हाताला कळु न देणे हिच इस्लामिक संस्कृती जपलात  मला काहीस लिहावे वाटले.
 खर्‍या अर्थीने भारतभर  सीएए एनआरसी एनपीआर  मुद्दा गाजत आहे.  कित्येक मुली, माता, भगीणी, जेष्ठ, संकटाला समोरे जाताहेत. ज्या महिला कधी घराबाहेर पडल्या नाहीत त्या न्याय व हक्कासाठी बाहेर पडताहेत पण शिक्षणापासून वंचित आहेत. शिक्षणाला महत्वपूर्ण स्थान देणे, महत्वपूर्ण आहेच व तुम्हीही शिक्षण हा जीवनाचा कणा समजून विद्यार्थ्यांना शिक्षण दिलात, देत आहात खरच ईश्वर (अल्लाह) च्या नजरेत विद्यार्थी, समाज, देश घडवण्याचे श्रेष्ठ काम करत आहात, आपणास येणार्‍या संकटाला समोरे जाण्याची ईश्वर (अल्लाह)  बळ देवो... आरोग्य देवो... हिच ईश्वर चरणी प्रार्थना.. आपणास उदंड आयुष्य लाभो तुमच्या पुढील जीवनात  प्रा. शाहेदा एम. पठाण  यांना वाढदिवसाच्या व जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने हार्दीक शुभेच्छा


Previous Post Next Post