Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

मागासवर्गीय च्या आरक्षणास भाजप सरकारकडुन धोका .

 


मागासवर्गीय च्या आरक्षणास भाजप सरकारकडुन धोका .


कॉंग्रेस मागासवर्गीय सेलचे राष्ट्रीय समन्वयक व प्रदेश प्रभारी मनोज बागडी यांचे प्रतिपादन 


लातूर प्रतिनिधी

मुँह में राम और बगल में छुरी अशी भुमीका केंद्र सरकारची असुन मागासवर्गीय समाजाला असलेले आरक्षण केंद्र सरकार कमी करू पाहते आहे . अशा सरकारला धडा शिकविण्यांची आवश्यकता असुन भाजप सरकारकडुन मागासवर्गीयांच्या आरक्षणास धोका असल्याने  समाज बांधवानी वेळीच सावध होण्यांचा सल्ला कॉंग्रेस मागासवर्गीय सेलचे राष्ट्रीय समन्वयक व प्रदेश प्रभारी मनोज बागडी यांनी समाज बांधवाना दिला .

       ते काँग्रेस भवन येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित आरक्षण बचाव अभियाना च्या  बैठकीत बोलत होते . यावेळी काँग्रेस पक्षाचे  मागासवर्गीय सेलचे प्रदेशाध्यक्ष विजय अंभोरे , प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. जितेंद्र देहाडे , प्रशांत पवार , लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अॅड . व्यंकटराव बेद्रे , लातूर जिल्हा मागासवर्गीय सेल जिल्हाध्यक्ष बबन ढगे आदींची उपस्थिती होती .

   पुढे बोलतांना ते म्हणाले की, काँग्रेस पक्ष हाच धर्मनिरपेक्ष विचारांचा व डॉ . बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा आहे. हे आरक्षण बचाव अभियान सबंध देशभर सुरू असुन गावागावात हे अभियान पोहचले पाहीजे .

या वेळी प्रदेशाध्यक्ष विजय अंभोरे , जितेंद्र देहाडे , प्रशांत पवार , अॅड. बेद्रे , बबन ढगे , डॉ. नवगीरे आदींची भाषणे झाली .

   कार्यक्रमांचे प्रास्ताविक बबन ढगे यांनी केले तर सुत्रसंचलन दत्ता बनाळे यांनी केले . यावेळी नगरसेवक नागसेन कामेगांवकर , गोटु यादव , श्रीमंत गायकवाड , कल्याण शाहीर , अनंतभाई वैरागे , सुनीता ढगे, दैवशाला राजमाने , विजय ढगे आदी सह लातूर जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Previous Post Next Post