Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

सर्वांगीण विकासाला गती देणारा अर्थसंकल्प ना.अमित विलासराव देशमुख

 


सर्वांगीण विकासाला गती देणारा अर्थसंकल्प


ना.अमित विलासराव देशमुख


मुंबई प्रतिनिधी :


महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजित पवार यांनी शुक्रवारी विधानसभेत सादर केला हा अर्थसंकल्प  राज्यातील सर्व घटकांना समान न्याय देणार आहे. अर्थसंकल्पात कृषी, उद्योग, आरोग्य आणि शिक्षण यासह सर्वच महत्वाच्या क्षेत्रांना प्राधान्य देऊन आर्थिक तरतुद केल्यामुळे एकूण राज्याच्या विकास प्रक्रियेला गती मिळणार आहे, अशी प्रतिक्रीया राज्याचे वैदकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्हयाचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी व्यक्त केली आहे.


   शुक्रवारी विधानसभेत सादर झालेल्या अर्थसंकल्पात कृषी कर्जमाफी, शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा, सौरपंप, ठिंबक सिंचनसाठी अनुदान, पशु व दुग्धविभागाला विशेषनिधी आदी गोष्टीच्या तरतुदी करून शेतकरी वर्गाला दिलासा देण्याचा प्रयत्न झाला आहे. यामध्ये शालेय शिक्षणासाठी २ हजार २५० कोटी तर उच्च्‍ व तंत्रशिक्षणासाठी १३०० कोटीची तरतुद करून प्राथमिक तसेच उच्चशिक्षण दर्जेदार व्हावे म्हणून अनेक योजनांसाठी निधीची घोषणा अर्थसंकल्पात झाली आहे. वैदयकीय शिक्षणाच्या जागा वाढविण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागासाठी ५ हजार कोटींची तरतुद करतांना नव्याने ५०० रूग्णवाहीका मंजूर करून राज्यातील सामान्य जनतेच्या आरोग्याची काळजी घेतली आहे. राज्यातील महिला सुरक्षेला प्राधान्य दिले आहे. त्यासाठी स्वतंत्र पोलीस ठाणे उभारण्याची घोषणा झाली आहे. राज्यातील उदयोग व्यवसायाला चालना मिळून रोजगारनिमीर्ती व्हावी यासाठी विशेष लक्ष या अर्थसंकल्पात देण्यात आले आहे. एकंदरीत सर्वच क्षेत्रासाठी आवश्यक गोष्टीची पूर्तता करण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पात झाल्याचे दिसून येत आहे असेही ना. अमित विलासराव देशमुख यांनी म्हटले आहे.


लातूर, उस्मानाबाद, बीडचा पाणी प्रश्न मार्गी लागणार


   मराठवाडा वॉटरग्रीड योजनेच्या पहिल्या टप्प्यात उजनी व जायकवाडी धरणाचे पाणी लातूर, उस्मानाबाद व बीड साठी देण्याची घोषणा या अर्थसंकल्पात केली आहे.हा महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण होवून या तीन्ही जिल्हयातील पाणी प्रश्न मार्गी लागण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल उचलले असून त्यांचे स्वागत सर्वस्तरातून होणार आहे.


स्मृतिस्थळाच्या घोषणेबददल शासनाचे आभार


ज्यांचे कार्य संस्मरणीय आणि अनुकरणीय आहे असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, शंकररावजी चव्हाण, गोपीनाथजी मुंडे, आर.आर.पाटील यांच्यासह आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब यांचे स्मृतिस्थळ उभारण्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजित पवारजी यांनी अर्थसंकल्प सादर करताना केली आहे, त्याबद्दल त्यांच्यासह मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे, महसूलमंत्री ना.बाळासाहेबजी थोरात यांचे ना. अमित देशमुख यांनी मनपूर्वक आभार मानले आहेत.


Previous Post Next Post