Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

लातूर शहरातील औषधी दुकाने सकाळी १० ते सायं. ४ पर्यंत खुली राहणार

 


लातूर शहरातील औषधी दुकाने सकाळी १० ते सायं. ४ पर्यंत खुली राहणार


लातूर  : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी तसेच प्रशासनास सहकार्य करण्याच्या उद्देशाने बुधवार, दि. २५ मार्च २०२० पासून  दि. ३१मार्च २०२० या कालावधीत लातूर शहरातील सर्व औषधी दुकाने सकाळी १० तेसायं. ४ या वेळेत खुली राहणार आहेत.कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणास रोखण्यासाठी प्रशासन स्तरांवरसर्वतोपरी उपाय योजना केल्या जात आहेत. प्रशासनास सहकार्य करण्यासाठीलातूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने हा निर्णय घेतला आहे. याव्यतिरिक्त रुग्णांची तात्काळ सेवा सर्व किरकोळ व ठोक औषधी दुकानदारांनीआपल्या कक्षेत घेऊन रुग्णांची  गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी,असेआवाहन जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असो.चे अध्यक्ष बोधकुमार चापसी, सचिव रामदास भोसले यांसह  सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.


Previous Post Next Post