इस्लामपूरातील सौदी अरेबिया हुन आलेल्या चारजणांना कोरोनाची लागण
सांगली/ प्रतिनिधी/ एकनाथ कांबळे
सौदी अरेबिया हुन आलेल्या चारजणांना कोरोनाची लागण झाली आहे हे सर्व एकाच कुटुंबातील अधिक माहिती अशी की हे सर्व *हजयात्रेवरून* शुक्रवार दिनांक १३मार्च रोजी आपले घरी परतले होते त्यावेळी त्यांना सर्दी,ताप, खोकला असा त्रास जाणवल्याने या सर्वांनी सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेतला होता परंतू त्यावेळी ते कोरोणाबादित असलेचे निष्पंन झाले नव्हते त्यामुळे हे कुटुंब इस्लामपूर येथे घरी परत आले होते परंतु काही दिवसांनी त्यांची फेर तपासणी केली असता या चारही वेक्तींना कोरोणाची लागन झाली आहे असे दिसून आले या सर्वांना सांगली येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले व उपचार सुरू केले आहेत! इस्लामपूर शहरात रात्री उशिरापर्यंत प्रांत अधिकारी मा.नागेश पाटील व पोलीस उपअधीक्षक मा.कॄष्णांत पिंगळे, वैद्यकीय अधिकारी मा.प्रज्ञा पवार आणी इस्लामपूर शहराचे नगराध्यक्ष मा.निशीकांत पाटील दादा यांच्या सह वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत तात्काळ नगरपालिका येथे बैठक घेण्यात आली व इस्लामपूर शहरात कोरोणा बाधीत चार रूग्ण आहेत या माहीवर शिक्कामोर्तब करण्यात आले त्यामुळे शहरात खळबळ उडाली होती त्यामुळे इस्लामपूर शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे !