Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

रिटायर उपविभागीय अभियंता विजय शास्त्री यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देवू केले ३५ हजार

 


रिटायर उपविभागीय अभियंता विजय शास्त्री यांनी
मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देवू केले ३५ हजार


लातूर,दि.२८ः लातूरमधील पाटबंधारे खात्यातील उपविभागीय अभियंता विजय गंगाधर  शास्त्री यांनी देशात कोरोना व्हायरसच्या निमित्ताने निर्माण झालेली आर्थिक कोंडी घेवून,राष्ट्रीय भान राखत आपल्या पेन्शन खात्यातून एक महिन्यांच्या ३५ हजार रुपयांच्या निधीचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सुपुर्द करुन संवेदनशीलता दाखविली आहे.
जगभरात कोरोना व्हायरसच्या आजाराने धुमाकूळ घातल्याने केंद्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून येत्या दि.१४ एप्रिल २०२० पर्यंत देशात लॉकडाऊन जाहीर केले आहे. परिणामी सर्वत्र आर्थिक व्यवहार पूर्णतः बंद झाले आहेत, भारत आणि महाराष्ट्रातही आर्थिक कोंडी निर्माण झाली आहे, देश आणि राज्यावर आलेल्या या राष्ट्रीय आपत्तीला प्रत्येकाने आपापल्या परीने सामोरे जाणे आवश्यक आहे, याची जाणीव ठेवून, अंबाजोगाई रोडवरील सोहम सोसायटीतील मुन्नाराजे फार्म हाऊस जवळ राहणारे,७४ वर्षीय, पाटबंधारे खात्यातील विभागीय उपअभियंता विजय गंगाधर शास्त्री यांनी आपल्या पेन्शन खात्यातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पुढे येत जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांच्याशी संपर्क साधून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक महिन्याचे पेन्शन ३५ हजार रुपयांचे देण्याचे औदार्य दाखविले.त्याला प्रतिसाद देत जिल्हाधिकारी यांनी आपला  प्रतिनिधी  शास्त्री यंाच्या निवासस्थानी रवाना करुन, मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठीचा शास्त्री यांनी देवू केलेला धनादेश  स्वीकृत केला.
दरम्यान, विजय शास्त्री यांच्या या राष्ट्रीय जाणीवेचे सर्वत्र कौतुक होत असून, आज निर्माण झालेल्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासत्तठी दानी,दात्यांनी सरकार आणि गरजूंच्या पुढे येण्याची गरज आहे


Previous Post Next Post