जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राखण्याचे पालकमंत्र्यांचे महापौरांना आणि जिल्हा परिषद अध्यक्षांना निर्देश
मुंबई दि 28-
लातूर शहर महापालिका क्षेत्रात त्याचप्रमाणे जिल्हाभरात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुलभ व्हावा यासाठी राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्याशी संपर्क साधून त्यांना सूचना दिल्या आहेत.
लातूरचे उपमहापौर, विरोधी पक्षनेते, विरोधी पक्षाचे गटनेते,आणि सर्व नगरसेवक यांची याकामी मदत घ्यावी सर्वांनी घराबाहेर न पडता याकामी आपला हातभार उचलावा. स्वस्त धान्य, किराणा त्याचप्रमाणे औषधाची दुकाने, दूध विक्री केंद्र, यांची प्रभाग निहाय ठिकाणं नामनिर्देशित करावीत आणि नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करावा अशा सूचना दिल्या आहेत.
स्वस्त धान्य दुकानांमधून धान्यासोबतच भाजीपाला, फळं, तेल, दूध,मिनरल वॉटर इत्यादी उपलब्ध करून द्यावे या दुकानांना घरं वाटून देण्यात यावीत आणि दुकानाबाहेर गर्दी होणार नाही या पद्धतीने दुकानांमधून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सुरू करण्यासाठी पावले उचलावीत, नागरिकांनीही सुद्धा लातूर शहर महानगरपालिकेला आणि ग्रामीण भागातील जनतेने जिल्हा प्रशासनाला याकामी सहकार्य करावे. करोना विरुद्धचे युद्ध आपणाला जिंकावयाचे आहे लातूर शहर आणि जिल्हा आज करोनामुक्त आहे आणि हीस्थिती आपणाला कायम राखावयाची आहे. यासाठी महापौर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्वांप्रमाणे घरी राहावं.स्वतः बरोबर त्यांच्या कुटुंबाचीही काळजी घ्यावी अशी सूचनाही पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी केली आहे
Tags:
MUMBAI