नेत्रशल्यचिकित्सालय तर्फे सुरक्षित होळीचा संदेश..!
प्रतिनिधी/सविता कुलकर्णी
नागपूर:-दि.८मार्च:- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नेत्रशल्यचिकित्सालय, नागपूर येथील डॉ. अशोक मदान प्राध्यापक व विभाग प्रमुख यांनी होळीच्या रंगाने डोळयाची निगा कशी करायची आहे. याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. होळीचा हा रंगाचा महोत्सव पूर्ण जगात खेळला जातो. दरवर्षी होळी मध्ये रंग व फुगेयामुळे खूप लोक दुर्घटना ग्रस्त होतात. भारतामध्ये हा सण सर्व राज्यात खेळला जातो. पण उत्तर भारतात याचे प्रमाण दक्षिण पेक्षा जास्त आहे. उत्तर राज्यामध्ये होळी सर्वात जास्त प्रमाणात खेळण्यात येतो.
रंगाचे फुगे सर्वात जास्त धोका दायक असु शकतात. त्यामुळे डोळ्यामध्ये रक्तस्त्राव किंवा लेन्स सरकु शकते. किंवा मागचा पडदा फाटून नजर पूर्ण पणे जाऊ शकते. या आकस्मिक अपघाताकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.रासायनिक कारणामुळे डोळ्यात होणाऱ्या इजा मुळे १७% प्रमाण होळी हलगर्जीपणे खेळल्याने होते. कृत्रिम रंगामध्ये काही धोकादायक रंग द्रव्य व पदार्थ आढळतात,जे माणसाच्या शरीराला हानिकारक असतात. वाळू काचपावडर, शिसा या सारखे पदार्थ डोळ्यात इजा किंवा आंधत्व देऊ शकतात. चमकी असलेल्या रंगामध्ये काचेसारखे पदार्थ जास्त असतात. ज्यामुळे बुबुळावर जखम होऊ शकते व डोळा लाल होऊ शकतो. दूषित पाण्यामुळे डोळयामध्ये जंतू संसर्ग होऊ शकतो. मागील वर्षी भारतामध्ये केलेल्या संरक्षणानुसार होळीमुळे होणाऱ्या डोळ्यांच्या इजा ही सरासरी २३ वर्षे असलेल्या लोकांमध्ये आढळते. यामध्ये ७६.१९% पुरुष आहेत व ६१.९०% मध्ये दोन्ही डोळ्यामध्ये रासायनिक कारणामुळे इजा झालेली आहे. मागील वर्षी २०१९ ला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे १९ रुग्ण होळीच्या रंगानी इजा झाल्यामुळे आले. ज्यमध्ये दोन गंभीर रुग्ण होते. त्यामधिल एका रुग्णाची संपूर्ण नजर गेलेली आहे, व दोन ते तीन रुग्णांना भरती करून इलाज करावा लागला. असे ही डाँ.अशोक मदान यांनी माहिती दिली.
* डोळयाची काळजी कशी घ्यावयाची या विषयी काही महत्वाच्या सूचना ही त्यांनी दिल्या. त्या पूढीलप्रमाणे.
१) बुबुळावर इजा झालीतर लगेच नेत्रतज्ञाकडे घेऊन जावे.
२) रंगामुळे डोळ्याची आग होऊ शकते, ती साफ पाण्यानी धुतली तर कमी होऊ शकते.
३) डोळयाच्या भवती नारळाचे तेल लावल्याने रंग निघून जाण्यास मदत होते.
४) निसर्ग जन्य रंगाचा वापर सुरक्षित असतो व त्याने इजा होत नाही. कारण त्याला चंदन पावडरने लाल रंग, हिना पावडरने हिरवा रंग, व हळदीने पिवळा रंग बनवू शकतो. नैसर्गिक गुलालाचा वापर करू शकतो.
५) चष्मा किंवा गाँगलच्या वापराने या इजे पासून वाचता येऊ शकतो.
६) प्रवासावेळी गाडीची काच बंद ठेवावी जेनेकरून या अपघाता पासून वाचता येईल.
७) रंग लावणा-यांना डोळ्याच्या भवती रंग लाऊ नये अशी विनंती करावी.
८) रंग लावताना डोळे घट्ट बंद करावे.
९) ओल्या जमिनीवरून धावणे किंवा उड्या मारणे टाळावे पाय घसरल्यास डोळ्याला मार लागु शकतो.
१०) मुलांना प्लास्टिकचे गाँगल ज्यांचा पट्टा चेह-याच्या भवती असतो वा तो घट्ट ठेऊ शकतो असे गाँगल्स वापरावे.
११) स्वच्छ पाणी व चांगल्या बादलीची व्यवस्था करावी, ज्यांनी लहानमुले घाण पाणी किंवा गडरचे पाणी वापरणार नाही.
१२) जर हे रंग डोळ्यात गेले तर डोळा लाल होऊ शकतो, जळजळ होऊ शकते व डोळा दुखुशकतो. अशा वेळी डोळे स्वच्छ पाण्याने धुवावेत. जळजळ किंवा दुखणे थांबले नाही किंवा नजर खराब झाली असता त्वरीत आपल्या जवळच्या नेत्र तज्ञास भेट द्यावी.
१३) रंगाच्या फुग्यामुळे जर का डोळ्यास मार लागला तर त्वरीत जवळच्या नेत्ररुग्णालयात भेट द्यावी.
रंगाच्या या सणात डोळ्यांची काळजी घ्या व आपल्या आयुष्यातील रंग उजळू द्या. असा सुरेख संदेश होळी निमित्ताने त्यांनी जनतेला दिला.
.