Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

पोलीस विभागानेही योग्य ती खबरदारी घ्यावी,पोलिसांकडून सामान्य नागरिकांवर हात उगारणे, काठी उगारणे असे प्रकार होऊ नयेत

 


पोलीस विभागानेही योग्य ती खबरदारी घ्यावी,पोलिसांकडून सामान्य नागरिकांवर हात उगारणे, काठी उगारणे असे प्रकार होऊ नयेत -पालकमंत्री अमित देशमुख 


जिल्ह्यातील नागरिकांनी लॉकडाऊनचे तंतोतंत पालन करावे


मुंबई, दि. 28 - आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक देशात कोरोना विषाणूंमुळे हाहाकार माजला असून आपल्या देशात व राज्यात ही कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी लॉक डाऊन करण्यात आलेले आहे. या लॉक डाऊन च्या कालावधीत लातूर जिल्ह्यातील एकाही नागरिकांनी घराबाहेर पडू नये व या कालावधीत शासन व प्रशासनाकडून देण्यात येत असलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी केले.
        सामान्य नागरिकांना लॉकडाऊनचा त्रास होणार नाही. पोलिसांकडून सामान्य नागरिकांवर हात उगारणे, काठी उगारणे असे प्रकार होऊ नयेत याकरिता खबरदारी घेण्याचे निर्देश पालकमंत्री अमित देशमुख यांनी पोलीस विभागाला दिले.
      जिल्ह्यातील नागरिकांनीही प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे योग्य ते पालन करावे आणि कोरोना व्हायरस च्या विरोधात सुरू असलेल्या लढाईत शासन-प्रशासन आणि पोलीस यांना सहकार्य करावे. प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचना या नागरिकांसाठी  व नागरिकांच्या सुरक्षेसाठी आहेत. त्यामुळे नागरिकांनी या काळात आपल्या घरीच राहावे. स्वतः बरोबरच इतरांचीही काळजी घ्यावी. कोरोना व्हायरस विरोधात सुरू असलेली लढाई जिंकण्यासाठी या अडचणीच्या काळात  शासन व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही अमित विलासराव देशमुख यांनी केले.
      जिल्ह्यात आतापर्यंत 55 व्यक्तींचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यातील 50 व्यक्तींच्या नमुने निगेटिव आलेले आहेत तर उर्वरित पाच व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत. तसेच जिल्हा प्रशासनाकडून घेतलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात आजपावेतो एकही कोरोना बाधित रुग्ण नाही
 त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये; परंतु प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे गांभीर्यपूर्वक पालन करावे असे आवाहन श्री. देशमुख यांनी केले


Previous Post Next Post