Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

निर्जन रस्ते,गार्डन,पानपट्टया बनल्या सामान्य नागरिकांच्या छेडछाडीची ठिकाणे..

 


निर्जन रस्ते,गार्डन,पानपट्टया बनल्या सामान्य नागरिक, वृध्द, महिला,मुलींच्या छेडछाडीचे ठिकाण .


लातूर,दि.१८ः लातूर शहरातील  मागास वसाहती व परिसरातील सार्वजनिक रस्ते, उद्याने आणि पानपट्टया या सर्वसामान्य नागरिक,ज्येष्ठ नागरिक, वृध्द, महिला,मुलींच्या छेडछाड,लुटीची,दादागिरीची ठिकाणे बनली असून,वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी या भागात गस्त वाढवून टुकार,गुन्हेगारीच्या पार्श्‍वभूमी असलेल्या व गुन्हेगारीच्या मार्गावर असलेल्या तरुणांवर कठोर कारवाई करुन सार्वजनिक शांतता आणि लोकांचे जिवीत ,मालमत्तेचे रक्षण करावे अशी मागणी होत आहे.
लातूर शहराच्या चोहोबाजूंनी साधारणतः स्लम एरिया, वसाहती आहेत. त्या-त्या भागातील दहा ते २५ वर्षे वयोेटातील  पाच ते दहा तरुंण शाळा-महाविद्यालये अर्धवट सोडून दिवसातला वेळ कसा घालवायचा म्हणून आपल्या परिसरातील सार्वजनिक रस्ते, उद्याने आणि पानपट्यावर घालत असून, ते येेथे एवढ्यावरच न थांबता सुपार्‍या चघळत, सिगरेंटी फुकत काहीही नेणे-देणे नसताना समोरुन जाणार्‍या ज्येष्ठ ,वृध्द, सामान्य नागरिक, महिला,मुलींची पाहून मोठ्याने हसणे,काहीतरी व्यंग काढून चिडवणे,  दुसरीकडेच हाका मारल्या सारखे करणे, ,पाठीमागून जावून मारणे, खडे मारणे, पैसे, मोबाईल हिसकावून घेणे, कपडे ओढणे किंवा वाहनांवरुन येवून  मारुन जाणे, दुचाकीवाल्याच्या गाडीवर काठी आपटणे, कोणी असे का करता म्हणून टोकले तर सामूहिकपणे हल्ला करणे,गंभीर मारहाण दुखापत करणे असे प्रकार करत आहेत.
गप्प बसले तरीही...
एखाद्याने एक ,दोन वेळा जावू द्या म्हणून टाळण्याचा प्रयत्न केला तर त्याला पुन्हा नेहमीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.वैतागून कोणी पाय रोवून त्याला गंभीर दुखापत करण्याचे प्रकार वाढत आहेत.
एक बिघडतो अन् इतरांना बिघडवतो
शहरातील  अशा मागास वस्त्यातील एखादा मुलगा गुन्हेगारी वृत्तीचा निघतो.एखादा गुन्हा दाखल झाला की मग तो दादा म्हणून पुढे येतो.. मग हा टुकार या परिसरातील अगदी दहा वर्षापासूनच्या मुलांना सुपारी, गटखा ,मावा ,सिगारेटीच्या नादाला लावून त्यांचेही शालेय, महाविद्यालयीन जीवन बरबाद करुन, त्याचे भविष्य अंधकारमय बनवत आहे.
एक रस्ता बदलला तरी..
विनाकारण कोणा टुकारंाचा त्रास नको म्हणून कोणी नेहमीचा रस्ता बदलून, इतर रस्त्याने जाण्याचा प्रयत्न केला तरी चौका-चौकात  हे टोळके थांबलेले असतात. त्यामुळे तिथेही तसाच त्रास असून, काम धंद्याला जायचे तरी कसे , यांच्या नादाला लागून आपले काम थांबवायचे काय,असा सवाल नागरिक करत आहेत.
बाजू घेणार्‍यांनाही त्रास
      पोलीस ,न्यायालयाकडून ज्येष्ठ, महिला,मुली,सर्वसामान्यांवर होत असलेल्या अन्यायाबाबत समाजाने ,सुजाण नागरिकांनी पुढे आले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करते म्हणून या  ज्येष्ठ नागरिक ,महिला ,शारीरिक दुर्बल व्यक्तीच्या मदतीला धावून  गेला. नेहमीचा होणारा त्रास पाहून कोणी समाजातील वयस्कर,सुजाण नागरिक मध्ये पडला तर त्यालाही  पाहून घेण्याच्या, चिडवण्याच्या ,त्याच्यावर हल्ला करण्याच्या घटना घडत आहेत,हे सार्वजनिक शांतता,कायदा व सुव्यवस्थेसाठी चागली बाब नाही.
घरापासून लांब राहणे
टुकार वृत्तीच्या या पोरांचे आई-वडिल कोठेतरी पोटाच्या मागे लागलेल्या असतात,काम -ंधंद्याला गेलेले असतात .त्यामुळे घरापासून काही अंतरावर, दुसर्‍या गल्लीतील पानपट्टी, चौक,उद्यानात,रस्त्यावर  जावून  हे लोकांना हकनाक छळायला,त्रास द्यायला मोकळे असतात.कोणी त्यांच्या पिछा करण्याचा प्रयत्न केला तर कोणातरी बोळातून ते पसार होतात.सामान्य,ज्येष्ठ, नागरिक, महिला,दुबळे लोक यांचा पाठलाग करु शकत नाहीत.मग त्यांच्य पालकांशी बोलून झाल्या घटनेची माहिती द्यायची कशी असा सवाल आहे.
गुटखावरुन बंद आतून चालू
लातूर शहरात वरवरची गुटखा बंदी असली तरी त्याची सर्रास विक्री चालू असून, खाणारे आणि विकणार्‍यांची घसट असल्याने लोेकांना बंदी असलेला गुटखा हमखास चघळायला मिळतोय.मग संबंधित यंत्रणा नेमकी काय करतेय असा सवाल केला जात आहे.
गर्दी असावी ही भावना
आपल्या पानपट्टी समोर जास्तीत  जास्त व्यसनी,टुकार,गर्दी करुन त्यांचा राबता राहणे म्हणजे आपल्या  व्यवसायात बरकत अशी पानपट्टी चालविणार्‍यांची अपेक्षा असून,काही अल्पवयीन मुलांना सुपार्‍या घासायला लावून व्यसनाकडे वळविण्याचा घाट घातला जातो,लहान मुलांना बरबाद,व्यसनी  करणारी ही ठिकाणे बनत आहेत.
कावाईचा फार्स...
टुकारांकडून विनाकारण होणार्‍या प्रकाराबाबत संंबंधित पोलीस ठाण्यात जावून तक्रार दिली तर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जाते, गुन्हा दाखल केलाच तर त्या आरोपिना अटकेसाठी गेल्याचा, आरोपी मिळालाच नाही,आमची नेहमीच पेट्रोलिंग असते, आमच्या कडेच पुरेसे पोलीस बळ नाही, आहे त्यातले कोणी रजेवर ,कोणी मंंत्र्यांच्य ादौर्‍यात,इतर कामात कोणीनवीन चोरी, अपघात, बलात्कार,खूनाचा  शोधासाठी बाहेर  असतो,असे ऐकून घ्यावे लागतेय. या सर्वांचा परिणाम तरुण पिढीचे जीवन गुन्हेगारीचे बनत आहेत. ज्येष्ठ,सामान्य, दुर्बल नागरिक, महिला,मुलींना अशा छेडछाडीचा सामना करावा लागतोय.वरिष्ठांना यात लक्ष घालून संबंधित पोलीस ठाण्यानां पुरेसे मनुष्यबळ द्यावेत, चिडीमार व अन्य पथकाचा पेट्रोलिंग वाढवावी लागेल.


Previous Post Next Post