Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

बंदीच्या काळात कुरिअर सेवा चालू ठेवण्यास परवानगी


बंदीच्या काळात कुरिअर सेवा चालू ठेवण्यास परवानगी


लातूर,दि.21:- शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्हीड 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, 1897 दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2,3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. याबाबतची नियमावलीही तयार करण्यात आली असून स्वतंत्ररित्या निर्गमित करण्यात आली आहे.
त्या अन्वये जिल्हयाच्या कार्यक्षेत्रात कोव्हीड-19 या प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यानुसार विषाणूचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी लातूर जिल्हयातील अत्यावश्यक आस्थापना वगळून सर्व आस्थापना व दुकाने दिनांक 21 व 22 मार्च 2020 रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले आहेत.
या आदेशातून लातूर जिल्हयातून वैद्यकीय तपासणीकरीता पाठविण्यात येणारे रक्त, थुंकी, ई. चे नमुने (Sampals)कुरिअरने पाठविणे आवश्यक असल्याने या कामाकरिता कुरिअर सेवा चालू ठेवण्याची परवानगी याव्दारे देण्यात येत आहे. व तसेच आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी निर्देशित केले आहे.


Previous Post Next Post