६५ ऐवजी ६० वर्षावरील जेष्ठ नागरिकांना एस टी प्रवासासह अन्य आर्थिक योजना मिळावे
लातूर/प्रतिनिधि
केंद्र शासनाने ६० वर्षा वरील जेष्ठ नागरिकांच्या चरितार्थ व कल्याणासाठी २००७ अधिनियम पारित केला आहे . महाराष्ट्र शासनाने ही १ मार्च २००९ पासून राज्यात लागू केला आहे . परंतु तेव्हा पासून आज पर्यंत राज्य शासन ६५ वर्ष वयाच्या मर्यादित अडकून पडले आहे . ६० वर्ष वयाचे शासनाचे जेष्ठ नागरिक धोरण असताना आज पर्यंत त्याची आमल बजावणी झालेली नाही . त्यामुळे आज ६० वर्ष असलेल्या जेष्ठ नागरिकांना एस टी पास सहीत अन्य आर्थिक योजनेचा लाभ मिळत नाही . एस टी महामंडळ या वर्षांपासून जेष्ठ नागरिकांना नवीन कार्ड उपलबध करून देत आहेत . परंतु त्यात ही ६० वर्ष वय असलेल्या जेष्ठ नागरिकांना पास दिला जात नाही . ही शासनाची शोकांतिका आहे . ग्रामीण भागातील जेष्ठ नागरिकांचा अशिक्षितपणा , विभक्त कुटुंब पद्धती , आर्थिक दुर्बलता व देशातील महागाई या मुळे त्यांची जीवनात आर्थिक व शारीरिक दोन्ही बाजूनी कुचंबणा होत आहे . आज राज्यात नवीव सरकार स्थापन झाले आहे . तेव्हा या सरकार कडून जेष्ठ नागरिकांना मोठी आपेक्षा आहे . त्यांच्या या समस्या ची सोडवणूक होईल असे त्यांना वाटत आहे . तेव्हा ६५ ऐवजी ६० वर्ष वय असलेल्या जेष्ठ नागरिकांना एस टी प्रवासासह अन्य आर्थिक यॊजनाचा लाभ मिळावा . अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुनील मंदाडे यांनी जिल्हाधिकारी मार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन केले आहे .
मोबाईल नं . ९४२३२६२९२८