Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

होलसेल व किरकोळ विक्रेत्यांकडून मास्क व सॅनिटायझर जप्त करण्याचे आदेश


होलसेल व किरकोळ विक्रेत्यांकडून मास्क व सॅनिटायझर जप्त करण्याचे आदेश


लातूर,दि.21:- शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्हीड 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, 1897 दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2,3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. याबाबतची नियमावलीही तयार करण्यात आली असून स्वतंत्ररित्या निर्गमित करण्यात आली आहे.
जिल्हयात कोरोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी आवश्यक साहित्यांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग लातूर यांनी लातूर जिल्हयातील सर्व होलसेल व किरकोळ औषधी/ वैद्यकीय साहित्य विक्रेते यांचेकडील कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी आवश्यक वैद्यकीय साहित्य (उदा.मास्क,सॅनिटायजर व इतर तत्सम साहित्य ) इ. चा साठा पोलीस विभागाच्या मदतीने जप्त करुन शासकीय दरानुसार अधिष्ठाता, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प.लातूर यांना उपलब्ध् करुन देण्याचे आदेश जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी दिले आहेत.


Previous Post Next Post