Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

.कॄष्णा सह.साखर कारखाना सभासदांची नेर्ले येथे कोपरा बैठक संपन्न

 


.कॄष्णा सह.साखर कारखाना सभासदांची नेर्ले येथे कोपरा बैठक संपन्न


सांगली/ प्रतिनिधी/ एकनाथ कांबळे
वाळवा तालुक्यातील नेर्ले येथे मा.अविनाश मोहिते दादा यांच्या उपस्थितीत मा.सुभाष पाटील विद्यमान संचालक यांच्या अध्यक्षतेखाली नेर्ले येथे कोपरा बैठक मा.सुभाष पाटील साहेब यांच्या घरासमोर बैठक घेण्यात आली आहे यावेळी य.मो.कॄष्णा सह.साखर कारखाना सभासदांनी मोठ्या संख्येने सहभागीयता दर्शविली आहे उपस्थित सभासद बांधवांना मा.अविनाश मोहिते दादा म्हणाले माझे आजोबा यांच्या व सभासदांच्या घामाच्या पैशातून हा कारखाना उभारला आहे या कारखान्याचे मालक हे सभासद बांधव आहेत व जो पर्यंत कारखाना आहे तो पर्यंत सभासद च त्याचे मालक आहेत सभासद व सामान्य शेतकऱ्यांना आरोग्ययंत्रणा उपलब्ध व्हायला हवी व ऊसतोड मजूर म्हणून काम करण्या-या मजूरांना आरोग्याची काळजी घेण्यासाठी व उपचारासाठी सोय झाली पाहिजे यासाठी सभासद बांधवांनी आपल्या कष्टाचे व घामाचे पैसे एकत्र करून कराड येथील कॄष्णा चारीटेबल ट्रस्ट उभारणी करण्यासाठी विश्वासाने पैसे देऊन ज्यांना सहकार्य केले आहे तेच या ट्रटचे मालक झाले आहेत हे कधीच भरून न एनारे नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे  ज्या शेतकऱ्यांनी पै-पैसा जमा करून ट्रस्ट उभारला त्यांच्या कडून हि भरमसाठ बिल घेतले जाते आहे हा अन्याय रोखण्यासाठी व शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर मिळाला पाहिजे यासाठी व सर्व सामान्य कामगारांना योग्य पध्दतीने त्याने केलेल्या कामाचा मोबदला मिळाला पाहिजे यासाठी आपण उद्याची एणारी निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले यावेळी वाळवा तालुक्यातील हजारो सभासद बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते !


Previous Post Next Post