Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

उस वाहतूक करणाऱ्या ट्रक्टर रस्त्याच्या कडेला असलेल्या पडक्या विहिरीत उसासह पलटी होऊन ट्रक्टर चालक जागीच ठार

 


उस वाहतूक करणाऱ्या ट्रक्टर रस्त्याच्या कडेला असलेल्या पडक्या विहिरीत उसासह पलटी होऊन ट्रक्टर चालक जागीच ठार


सांगली/ प्रतिनिधी/ एकनाथ कांबळे


य.मो.कॄष्णा सहकारी साखर कारखाना लि.रेठरे बुद्रुक ता.कराड जि.सातारा ,चालु वर्षांचा उस गळीत हंगाम सुरू झाला असून अनेक जिल्ह्यांतून उस तोडणी मजूर येत असतात किल्ले मच्छिंद्र गड येथील शिक्षक काॅलनी जवळ उसाने भरलेल्या दोन ट्र्याॅल्या घेऊन कारखान्याकडे जात असताना अती उताराचा रस्त्यावरून जाताना ट्रक्टर चालकाला  अतिशय कसरत करावी लागली असावी चालकास ट्रक्टर न सावरता आलेमुळे  लोडचा  ट्राॅल्यासह ट्रक्टर रस्त्याच्या कडेला असलेल्या पडक्या विहिरीच्या कडेला जावून जोरात  पलटी झालेने ट्रक्टर चालक ईश्र्वर अभिमान उघडे वय-३५ मुळगांव-मुरवेड ता.बिड यांचा बुधवार रोजी सायंकाळी ठिक साडे सहा वाजण्याच्या सुमारास  दिनांक२५!०३/२०२० रोजी  जागीच मृत्यू झाला आहे त्यांच्या पश्चात आई,भाऊ,व वहाण चार वर्षांचा मुलगा असा परिवार आहे मयत ईश्र्वर अभिमान उघडे  मासिक पगारा पोटी ड्रायव्हर म्हणून काम करत होते !
अपघातानंतर काही क्षणातच लोक गोळा झाले अपघातात ड्रायव्हर मयत झालेल्या अवस्थेत दिसून येत होते त्यामुळे किल्ले मच्छिंद्र गड येथील युवकांनी एकमेकांना फोन करून अपघाताच्या ठिकाणी बोलून पोलिस प्रशासन ग्रामिन पोलिस ठाण्याचे पदाधिकारी मा.पी.बी.पवार पोलिस नाईक यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ मयतास बाहेर काढण्यासाठी युवकांच्या मदतीने उस बाजूला करण्याचे काम केले व मयत ईश्वर अभिमान उघडे यांना बाहेर काढून पंचनामा करण्यात आला व पि एम साठी कराड येथील शासकीय दवाखान्यात नेहणेत आले  शासकीय नियमानुसार प्रोसेस पुर्ण झाले नंतर घटनास्थळी उपस्थित नातेवाईक यांच्या ताब्यात बाॅडी  देणेत आली !


Previous Post Next Post