सुरूल येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिला समुपदेशन केंद्र ईस्लामपूर तथा पोलिस प्रशासन यांच्या वतीने भव्य मेळावा
सांगली/ प्रतिनिधी/ एकनाथ कांबळे
जागतिक महिला दिनानिमित्त वाळवा तालुक्यातील सुरूल येथे महिला समुपदेशन केंद्र ईस्लामपूर व पोलीस प्रशासन यांच्या वतीने महिलांचा भव्य दिव्य असा मेळावा उत्साहात साजरा करण्यात आला आहे यावेळी उपस्थित माण्यवर मंडळीच्या हस्ते सुरूल गावातील प्रमुख समाजसुधारक व महिला माण्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला हा सत्कार मा.बालाजी बोकलवाड संरक्षण अधिकारी व मा.नारायन देशमुख पोलिस निरीक्षक ईस्लामपूर पोलिस ठाणे,मा.संपतरावजी वारके पोलिस पदाधिकारी व सुरूल गावच्या सरपंच मा.सौ.कुंदाताई पाटील यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले व श्री सरस्वती देवी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आणी कार्यक्रमाची सुरुवात करणेत आली यावेळी उपस्थित माण्यवर मंडळीच्या वतीने मनोगत व्यक्त करण्यात आले सर्वच माण्यवरांनी सुंदर असे मार्गदर्शन केले समोरील उपस्थित महिला व युवती यांचे समाधान झाले चे त्यांच्या चेहऱ्यावरील हस्स्याने दिसून आले ! महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिस प्रशासन वचनबद्ध आहे असे मत मा.संपत वारके,मा.नारायन देशमुख साहेब म्हणाले ! उपस्थित माण्यवर मंडळी मा.सौ.सारीका घाडघे महिला समुपदेशन केंद्र ईस्लामपूर पदाधिकारी,सौ.शितल खोत,मा.संभाजी शिंदे,सौ.मणाली घोरपडे, अॅड.मनिषा पाटील मॅडम,प्रस्ताविक व सुत्रसंचलन मा.सौ.शांताबाई पाटील मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुरूल,व आभार मा.नामदेव पाटील बापू यांनी मानले