पत्रकार संघा चे जिल्हाध्यक्ष घोणे याना मारहाण करनार्या पोलीस व उपविभागीय पो.अधिकारी सचिन सांगळे यांच्यावर कार्यवाही करुण निलंबित करा:- उदगीर पत्रकार
उदगीर येथील 38 पत्रकाराच्या सह्याचे निवेदन गृहमंत्री,मुख्यमंत्री,पोलीस महासंचालक,विशेष पोलीस महानिरीक्षक नांदेड़,पोलीस अधिक्षक लातूर याना उपजिल्हाधिकारी मार्फत देऊन केली मागणी
उदगीर:- लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अधक्ष नरसिंग घोणे याना मंगळवारी 24 मार्च रोजी लातूर येथील शिवाजी चौकातुन कार्यालयात येत असताना लातूर चे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे व उपस्थीत पोलीस कर्मचारयानी अमानुष मारहाण केली होती त्याचा उदगीर येथील पत्रकारानी निषेध करत गृहमंत्री व संबंधिताना निवेदन देऊन कार्यवाही व निलंबनाची मागणी केली आहे
एकीकडे पंतप्रधान पत्रकाराचे कौतुक करतात,दुसरी कडे माहिती व प्रसारन मंत्री प्रकाश जावडेकर पत्रकारास माराल तर कार्यवाही करु म्हणत असताना लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अधक्ष नरसिंग घोणे याना लातूर चे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे व उपस्थीत पोलीसानी अमानुष मारहाण करून सर्व पत्रकारांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला, एवढेच नाही तर का मारले?असे फोन करुन विचारनार्या संपादकास माजोरी उपविभागीय पोलीस अधिकारयानी गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली .असे माजोरी आणि लातूर ला बदनाम करणार्या उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे व मारहाण करनार्या पोलीसावर कार्यवाही करुन त्वरित निलंबित करावे आशा मागणी चे निवेदन उदगीर येथील उपजिल्हाधिकारी प्रविण मेंगशेट्टी यांच्या मार्फत गृहमंत्री अनिल देशमुख,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,पोलीस महासंचालक मुंबई ,विशेष पोलीस महानिरीक्षक नांदेड़,राजेंद्र माने पोलीस अधिक्षक लातूर याना देऊन करण्यात आले आहे .