Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

जिल्हयात 14 एप्रिल पर्यंत मद्य विक्री बंद

 


जिल्हयात 14 एप्रिल पर्यंत मद्य विक्री बंद


लातूर,दि.1:- देशात तसेच महाराष्ट्रातही कोरोना विषाणूचे बाधीत रुग्ण्‍ आढळून येत असल्याने त्याचा प्रसार तसेच प्रार्दुभाव टाळणेस अनुसरुन जिल्हयातील सर्व किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्ती दिनांक 31 मार्च 2020 पर्यंत पुर्ण दिवस मद्यविक्रीसाठी बंद ठेवण्याचे आदेश पारित करण्यात आलेले होते.


       या अनुषंगाने या विषाणूचा प्रसार व प्रार्दुभाव रोखणेस अनुसरुन केंद्र शासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनामध्ये व्यापकता वाढविली असून दि. 14 एप्रिल 2020 च्या मुदतीपर्यंत संपुर्ण देशात लॉकडाऊन जाहिर केलेला आहे.  यास अधिनियमातील अधिकाराचा वापर करुन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी लातूर जिल्हयातील सर्व किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्ती दिनांक 31 मार्च 2020 नंतर दिनांक 14 एप्रिल 2020 पर्यंत मद्यविक्रीसाठी संपुर्णत: बंद ठेवण्याचे आदेश देत आहेत.


       या आदशाचे उल्लंघन झाल्यास त्यांचेविरुध्द महाराष्ट्र मद्यनिषेध कायदा 1949 व त्या अंतर्गत असलेल्या नियमानुसार योग्य ती कडक कार्यवाही करण्यात येईल याची स्पष्ट नोंद घ्यावी, असे आवाहन  जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी  केले आहे


Previous Post Next Post