परजिल्ह्या व परप्रातीय कामगार मजूर स्थलात्तरीतांनी
लातूर जिल्हा प्रशासनाला त्वरीत संपर्क साधावा
त्यांच्या अडचणी दूर केल्या जातील
पालकमंत्री अमित विलासराव देशमुख
लातूर (प्रतिनिधी) :
कोवीड –19 आणि वाढलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभुमीवर पर जिल्ह्यातील अथवा परप्रातीय कोणी व्यक्ती, मजुर किंवा स्थलांतरीत व्यक्ती लातूर जिल्ह्यात असल्यास त्यांनी जिल्हा प्रशासनाशी त्वरीत संपर्क साधावा व आपली माहिती द्यावी असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे.
पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी म्हटले आहे की, कोवीड19 कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी 3 मे पर्यंत वाढविला आहे. या परिस्थितीत इतर जिल्ह्यातील तसेच परराज्यातील कोणी व्यक्ती, मजुर, कामगार किंवा स्थलांतरीत व्यक्ती लातूर जिल्ह्यात आडकून पडले असतील तर त्यांनी आपली संपुर्ण ओळख व कुठे थांबले आहेत याची माहीती जिल्हा प्रशासनाला कळविणे आवश्यक आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी या माहीतीचा उपयोग होणार आहे. शिवाय अशा अडकून पडलेल्या लोकांना मदत पोहचविणे व त्यांच्या समस्या सोडविणे शक्य होणार आहे. आपले आरोग्य चांगले राखण्यासाठी तसेच अडचणी, समस्या सोडवून घेण्यासाठी इतर पर जिल्हे किंवा परप्रातातील व्यक्ती, मजुर, कामगार स्थलातरीत व्यक्ती यांनी जिल्हा प्रशासनाचे त्या त्या तालुक्यातील, मंडळातील किवा गावातील स्थानिक अधिकारी, कर्मचारी, जवळचे पोलीस स्टेशन यांच्याकडे आपली माहिती देणे अनिवार्य आहे. तसेच अशा नागरिकांनी निवासी उपजिल्हाधिकारी आनंत गव्हाणे भ्रमणध्वनी 9420205555 आणि रवी गायकवाड भ्रमणध्वनी 9922308122 यांच्याशी संपर्क साधावा, असे पालकमंत्री देशमुख यांनी म्हटले आहे.