Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

जिल्हयात एक ही कोरोना बाधित रुग्ण् नाही, * आजपर्यंत 4 हजार 380 व्यक्तींची तपासणी ,

 


जिल्हयात एक ही कोरोना बाधित रुग्ण् नाही


* आजपर्यंत 4 हजार 380 व्यक्तींची तपासणी ,


* 63 व्यक्तींची  स्वॅब अहवाल निगेटिव्ह


*47 व्यक्तीं जिल्हा आरोग्य विभागामार्फत Home Quarantined मध्ये निगराणीखाली


लातूर,दि.1:-लातुर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक 01 एप्रिल 2020 रोजी सकाळी 8.00 ते दु 4.00 पर्यंत एकुण 173 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. आजयपर्यंत एकुण 4380 व्यक्तींची तपासणी करण्यात आली असुन आजतागायत एकुण 63 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी रष्ट्रीय विषाणु संस्था, पुणे येथे पाठविण्यात आले होते. त्यापैकी 63 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आलेले आहे. आजपर्यंत एकुण 14 व्यक्तींचा  Quarantined कालावधी संपला आहे व इतर 47 व्यक्तींना जिल्हा आरोग्य विभागामार्फत Home Quarantined मध्ये निगराणीखाली ठेवण्यात आले आहे अशी माहिती डॉ. मारुती कराळे कोरोना विलगीकरण कक्ष प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक औषधवैद्यकशास्त्र विभाग यांनी दिली. 


प्राथमिक तपासणी नंतर COVID-19 आजारा सारखी लक्षणे आढळल्यास किंवा कोरोना बाधित / संशयित व्यक्तींचा संपर्क झाला असेल तर अशा व्यक्तींना व प्रवाशांना विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था, लातुर येथील कोरोना विलगीकरण कक्षात तपासणीसाठी पाठविण्यात यावे असे आवाहन डॉ. गिरीष ठाकुर  अधिष्ठाता, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था, लातुर यांनी केले आहे.


Previous Post Next Post