Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

*जिल्ह्यात आजपर्यंत 4 हजार 987 व्यक्तींची तपासणी,तर 8 व्यक्तींचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह.

 


जिल्ह्यात आजपर्यंत 4 हजार 987 व्यक्तींची तपासणी,


8 व्यक्तींचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह.


लातूर, दि.5:-  विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक 05 एप्रिल 2020 रोजी सकाळी 8.00 ते दु 4.00 पर्यंत एकुण 70 व्यक्तींची तपासणी करण्यात आली असुन आजतागायत एकुण 4987 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यातील 105 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी रष्ट्रीय विषाणु संस्था, पुणे येथे पाठविण्यात आले होते.
त्यापैकी दिनांक 04 एप्रिल.2020 रोजी 14 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी  सर्वच  14 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आलेले आहेत.  आजपर्यंत एकुण 29 व्यक्तींचा Home Quarantined  कालावधी संपला आहे व इतर 57 व्यक्तींना जिल्हा आरोग्य विभागामार्फत Home Quarantined मध्ये निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. तसेच 12 व्यक्तींना या संस्थेच्या विलगीकरणं कक्षात ठेवण्यात आले आहे त्यापैकी 8 व्यक्तींचा कोरोना चाचणी अहवाल Positive आहे व 4 व्यक्तींचा कोरोना चाचणी अहवाल Negative आहे व इतर 7 व्यक्तींना Institutional Quarantined मध्ये ठेवण्यात आले आहे, अशी माहिती  कोरोना विलगीकरण कक्ष प्रमुख तथा औषधवैद्यकशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. मारुती कराळे यांनी दिली. 
 लातूरकरांनी घाबरून जाऊ नये आपण घरीच सुरक्षित राहावे खबरदारीचा उपाय म्हणून कोरोना (कोविड 19) शी लढण्यासाठी आवश्यक सर्व साहित्य विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेत मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत.
जसे की, PPE KIT 1000, N95 Masks 7500,Triple  Layer Masks 70000, Examination Glose 25000 उपलब्ध आहेत.  तसेच शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे व विनाकारण कोणीही घराबाहेर पडू नये असे आवाहन , विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था अधिष्ठता डॉ. गिरीष ठाकुर यांनी केले आहे. 


Previous Post Next Post