लातूर मध्ये अवैध गुटख्यावर धाडी
संपूर्ण भारतात करोना विषाणु मूळे लाॅकडाऊन असताना मात्र लातूर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्री करणार्यांनी आपले तोंड वर केले आहे,दिनांक 2एप्रिल रोजी 15:30 च्या सुमारास गांधी चौक पोलिस स्टेशन हद्दीत असलेल्या लड्डा ट्रेडिंग, शिवाजी रोड, लातूर या दुकानावर धाड टाकून तब्बल 58हजार रुपयाचा तंबाकू जन्य पदार्थ, तंबाकू,बीड़ी,सिगारेट जप्त कयण्यात आला आहे.आजून दोन दूकानावर धाडी टाकल्याची माहिती सांगण्यात येत आहे. लड्डा ट्रेडिंग,या दुकानचे मालक नामे बंकटलाल मदनलाल लड्डा वय 58,यांच्या विरुद्ध पोलिस स्टेशन गांधी चौक गु.नं169/2020कलम 269,270,188भादावि कलम आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005प्रमाणे कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे.हि कार्यवाही उप विभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गफ्फार खलिल शेख,पोह जिवन जाधव,पो ना दयानंद आरदवाड,ज्ञानेश्वर काळगे,मिनीनाथ मगर यांनी कार्यवाही साठी सहकार्य केले.
(कासरगाव येथे एका शेताजवळच्या गोडाऊनमध्ये साठवणूक केलेला २५ लाखांचा गुटखा पोलिसांनी पकडला आहे. लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात संबंधीत व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे अशी प्राथमिक माहिती आहे.सदरील व्यापाऱ्याची लातूर शहरातील गंजगोलाई येथे दुकान असून ग्रामीण भागात हा गुटखा पुरवला जात होता)
माननिय उप विभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे यांनी काही दिवसापूर्वी लातूर च्या नागरिकांना कोरोनावायरस मूळे घराच्या बाहेर कोणीही निघू नये असे आवाहन करण्यात आले होते,या मध्यमे जर कोणी बाहेर निघाले तर त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगीतले.रोडवर येणार्या लोकांवर नजर ठेवण्यासाठी द्रोण चा वापर करणार असल्याचेही ते म्हणाले.आता खरच या द्रोण चा वापर करण्याची वेळ आली आहे, लातूर जिल्ह्यात लाॅकडाऊन मध्ये अवैध धंद्याचे प्रमाण वाढले असून त्यावर आता नियंत्रण ठेवण्यास पोलिस अधिकार्यांनी आता हायटेक होण्याची गरज असल्याचे नागरीकांकडून बोलले जात आहे.खरच या द्रोण चा वापर अवैध धंधे रोकण्यासाठी उप विभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे हे करतील का?या कड़े आता सर्व लातूर च्या जनतेचे लक्ष लागले आहे. नोट-करोना विषाणु चा फैलाव दिवसेंदिवस वाढत आहे, कृपया कोणीही घराच्या बाहेर निघू नये हि विनंती