Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

कोरोनाबात चे पुन्हा एकदा परराज्य कनेक्शन उघड! त्या लोकांवर गुन्हा दाखल: नाकाबंदी नावालाच!

 


कोरोनाबबात चे पुन्हा एकदा परराज्य कनेक्शन उघड! त्या लोकांवर गुन्हा दाखल: नाकाबंदी नावालाच!


उदगीर/प्रतिनिधी/डि के उजळंबकर
केंद्र शासनाने परजिल्हाबंदीचे फरमान काढले याची री ओढत राज्यशासनाने एकपाऊल पूढे होत परजिल्हाबंदीकेली याच्याही पूढे जात गावकरी ने तर चक्क गावबंदी केली. हे सर्व कायदे धाब्यावर बसवत या परिसरात चक्क परजिल्हयातील चारजण येतात याचा थांगपत्ता सुद्धा प्रशासनाला लागत नसल्याचे आता हळूहळू उघड होत असल्याने नाकाबंदी म्हणजे एकप्रकारे कागदावरच असल्याचे याघटनेवरू समोर येत आहे.
तीन राज्याच्या सीमेवर असलेल्या याशहराचा इतिहास भुगोल  गुन्हेगारीने गुरफटलेला आहे,हे सर्वांना परिचित आहे. याठिकाणी दोन स्वंतत्र पोलीस ठाणे आहेत. एक शहरासाठी तर दुसरे ग्रामीण भागासाठी. याठिकाणी सद्या करोणा रोगाची लागण मोठ्या प्रमाणात होत असताना मात्र याकडे प्रशासन  यारोगाबाबत उदासीन असल्याचे नाकाबंदी उल्लंघन घटनेवरून दिसून येत आहे. करोणाबाधित महिला दगावली या प्रकारणात सुद्धा परराज्य कनेक्शनचा प्रश्न ऐरणीवर  आला होता. परंतु यामगे जो नेटवर्क आहे याचा तपास कोणी करावा यात पोलीसप्रशासन व्यस्त असताना पुन्हा एकदा परराज्य कनेक्शन उघड झाले. यातही नाकाबंदीचा आदेशाला केराची टोपली दाखवत कंटेनर काही जण या शहरात दि.23 रोजी आले असल्याची माहिती मिळाली आणि या  परिसरात एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर त्यांना 26 रोजी होम क्वारंटाईन होण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानंतर त्यांचे स्वॅब पाठवण्यात आले. सदरील लोक उदगीर शहरातील राहणारे असून त्यापैकी काहींचा अहवाल पॉझिटिव आल्यामुळे त्यांची अधिक चौकशी करून सरकार पक्षाच्या वतीने पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी माधव केंद्रे यांनी उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्यावरून उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे या आरोपी च्या विरोधामध्ये गुरनं 163/ 20 कलम 188, 269 ,270 भा. दं. वि. यांच्यासह साथ रोग प्रतिबंधक अधिनियम चा कलम 2,3,4 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वार्यासारखी पसरली.हे लोक शहरात 23एप्रिल रोजी आले होते तर आजपर्यंत गुन्हा का दाखल केला गेला नाही? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. त्यांच्यावर साथरोग नियंत्रणाच्या संदर्भामध्ये शासनाने आणि जिल्हाधिकाऱ्याने राज्य बंदी आणि जिल्हा बंदीचे आदेश काढलेले असताना त्या आदेशाचे उल्लंघन करून राज्यात साथीचे रोग पसरले असताना हायगय करून स्वतःचे व समाजाचे नुकसान पोहोचण्याच्या कृत्याबद्दल त्यांच्यावर आरोप ठेवून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा तपास पो.हे. काॅ. व्ही. एस. कुलकर्णी हे ज्येष्ठ पोलीस निरीक्षक सोपानराव शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.               
परराज्यातून  उदगीर  पर्यंत  हे लोक पोहोचतातच कसे? हा प्रश्न आता सर्वसामान्य जनता प्रशासनाला विचारू लागली आहे. तसेच उदगीर शहरामध्ये कोरोनाची सुरुवात कशी झाली? त्याचा मुख्य कोरिना कॅरियर कोण ?याचा शोध प्रशासनाला का लागत नाही?  असा प्रश्न सर्वसामान्य जनता करत आहे.


परराज्यातून येणार्या पार्सलवर लक्ष ठेवण्याची गरज


उदगीर व जळकोट परिसरात परदेशात काम करणार्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यात बिगरहिंदुची संख्या कमालीची आहे. या सर्व जणांची माहिती ती पैश्याच्या देवाणघेवान वरून काढल्यास याचा सुद्धा फायदा या करोणाच्या लढाईत होवू शकतो. कारण दि.22मार्च पासून या ठिकाणी संचारबंदी आहे. यापूर्वी चा मनीट्रासफर च्या शहरातील खाजगी दुकानातून पोलिस प्रशासनाने माहिती घेतल्यास याचा फायदा होणार आहे. करोणा रोगाच्या सानीध्यात आलेले कांही परदेशी नागरिक याठिकाणी सापडू शकतात यावर ही परराज्यातून आलेले ग्रह उपयोगी पार्सल याची चौकशी करणे गरजेचे आहे यामुळे करोणारोगावर आळाबसणार आहे.


Previous Post Next Post