Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

पालघर जिल्ह्यात झालेल्या साधूंच्या हत्तेची चौकशी C B I मार्फत करा गोसावी समाजाची मागणी

 


पालघर जिल्ह्यात झालेल्या साधूंच्या हत्तेची चौकशी C B I मार्फत करा
गोसावी समाजाची मागणी


लातूर/प्रतिनिधि 
 महाराष्ट्रातील पालघर येथील मनाला भेडसावणारी व दशनाम गोसावी समाजासाठी  निंदनीय असणारी घटना घडली आहे. "श्री पंच दशनाम जुना आखाडा" १३ मंडी मीर्जापुर परिवाराचे महंत राम गिरी गुजरात वेरावल सोमनाथ जवळ त्यांना शिवआज्ञा झाली होती म्हणून मीर्जापुर परीवाराच्या काही महंतांना समाधी पुजनासाठी बोलावण्यात आले होते, ज्यामध्ये महंत कल्पव्रुक्ष गिरी वय (७०) वर्ष व दुसरे महंत सुशील गिरी वय( ४५) वर्ष हे नाशिक  वरून वेरावल गुजरातला जाण्यास निघाले असता पालघर मधील डहाणू तालुक्यातील गडचिचले या गावाच्या पोलिस स्टेशनने त्यांची गाडी थांबवून गाडी बाहेर बोलावले व सदर महंत,ड्रायव्हर यांना रोडच्या मध्ये बसवण्यात आले. त्यानंतर गावातील काही लोकं तेथे जमा झाले आणि पोलिसांनी दोन्ही महंत व त्यांच्या ड्रायव्हरला ग्रामस्थांना सुपूर्द केलं व गावातील काही गावगुंडांनी  गोष्टीची शहनिशा न करता विचार विनिमय न करता त्या महंत व ड्रायव्हरला पोलिसांच्या गाडीतून काढून लाठ्या काठय़ांनी व दगडांनी ठेचून मारले ज्यामध्ये दोन्ही महंत व ड्रायव्हरचा अतिशय निर्घुन हत्या केली.व त्यांचा त्यात दुर्देवी मृत्यू झाला, ही अतिशय निंदनिय बाब आहे. गोसावी समाजाचे महंत पोलिसांचा गाडीत होते त्या गाडीची तोडफोड करुन वृद्ध महंतांना गावकऱ्यांच्या हातात देऊन मारण्यात आले असे एकंदर परिस्थिती पाहता दिसते. सदर वृतांतावरून तेथील स्थानिक पोलिसांचा ही जाहीर निषेध करण्यात येत आहे सदरील प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी या मागणीचे निवेदन गोसावी समाज युवा प्रतिष्ठान लातूरच्या वतीने मुख्यमंत्री ,गृहमंत्री, विरोधीपक्षनेते ,पोलिस महासंचालक ,जिल्हाधिकारी ,पोलीस अधीक्षक व लोकप्रतिनिधींना गोसावी समाजाच्या वतीने online देण्यात आले या प्रकरणाची C B I मार्फत चौकशी करून दोषींवर कडक शासन करण्यात यावी अशी मागणी गोसावी समाजाचे अनिल पुरी ,धर्मवीर भारती ,अरुण गिरी ,अशोक गिरी ,विनायक गिरी ,राजू गिरी ,रविकिरण गिरी ,प्रेम गिरी ,व्यंकटेश पुरी ,शिवकुमार गिरी ,नागनाथ गिरी ,पद्माकर गिरी ,कालीदास गिरी ,उद्य गिरी ,रमेश भारती ,गणेश भारती ,दिनेश पुरी ,गणेश पुरी ,संजय अरण्य ,चंद्रकांत गिरी ,डॉ विश्रांत भारती ,डॉ सुनील पुरी ,सत्यवृत्त सागर  ,रवींद्र गिरी ,शिवशंकर गिरी ,सचिन पुरी ,करान बॅन ,दत्ता गिरी ,राजू भारती ज्ञानेश्वर भारती ,कृष्णा भारती आदीने निवेदनाद्वारे केली आहे


Previous Post Next Post