लाॅक डाउन असताना हि आठवडी बाजार भरला नागरीकांची मोठ्या प्रमाणात गर्दी
सांगली/ प्रतिनिधी एकनाथ कांबळे
वाळवा तालुक्यातील किल्ले मच्छिंद्र गड कार्यक्षेत्रामध्ये य.मो.कॄष्णा सह.साखर कारखाना मेन गेट समोर मोठ्या प्रमाणात बाजार पेठ असून स्थानिक व्यावसायिकांनी कायद्याचे पालन करत आप-आपली दुकाने बंद ठेवली आहेत,परंतू आज मंगळवार रोजी येथील आठवडी बाजार असतो परंतु कोरोणा विषाणू फैलाव रोखण्यासाठी भारत सरकारने हाय अलर्ट जारी केला आहे जेणेकरून या कोरोणा विषाणू पासून भारत वाशियांचे रक्षण करता येईल यासाठी महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी अहोरात्र कोरोणा विषाणू फैलाव रोखण्यासाठी आपली जबाबदारी बजावीत असताना जणता रस्त्यावर फिरताना दिसत आहे ,स्वताच्या कुटुंबाची काळजी न करता पोलिस प्रशासन पदाधिकारी जणतेची सेवा करताना दिसून येत आहेत
या.मो.कॄष्णा सह.साखर कारखाना मेन गेट समोर मोठ्या संख्येने लोक शासणाचे नियम धाब्यावर बसवून गर्दि करत आहेत प्रत्येक नागरिकाला नियम दिलेला असताना त्या नियमांचे पालन होत नाही असे दिसून येते आहे आपणच आपले रक्षणार्थ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार घरीच बसून राहिले पाहिजे शासन गल्ली बोळात सुध्दा सर्व सुविधा उपलब्ध करून देत असताना जमाव बंदी नियमांचे पालन केले जात नाही असे दिसून येते आहे जणतेने शासनास योग्य पध्दतीने सहकार्य न केल्यास कडक कारवाई करणार असे पोलिस प्रशासन यांच्या वतीने सांगण्यात आले आले आहे !