जिल्हाधिकारी यांचा धिक्कार असो....
या घोषनेने दणाणले शिवाजी महाविद्यालय
उदगीर/प्रतिनिधि
उदगीर- लोका सांगे ब्रम्हज्ञान -- -- म्हणी प्रमाणे जिल्हाधिकारी यांचे वागणे होते,शिव भोजन केंद्राचे उद्घाटन असताना,राज्यमंत्री यानी मास्क घातले होते तर जिल्हाधिकारयानी ना मास्क घातले होते ना येथील चपाती तपासत असताना हात सेनटराइज केले याची चर्च्या उद्घाटना नंतर जोरात चालू होतीउदगीर बैठकीस राज्यमंत्री संजय बनसोडे यानी पत्रकाराना आमंत्रित केले,मात्र जिल्हाधिकारी यांनी संचारबंदी चे कारण पूढे करत पत्रकाराना काढले बाहेर,जिल्हाधिकारी यानी पत्रकारांना सभागृहाच्या बाहेर काढल्याने पत्रकारानी संताप व्य्क़्त करत सभागृहा बाहेर ठिय्या मांडला,बैठक संपल्या नंतर राज्यमंत्री यानी येवून पत्रकाराची माफी मागीतली परंतु पत्रकारानी राज्यमंत्री मोठा का जिलाधिकारी मोठा,राज्यमंत्री यानी पत्रकारास निमंत्रण दिले म्हणून पत्रकार आले असताना जिल्हाधिकारी यानी पत्रकारान बाहेर काढले असताना राज्यमंत्री गप्प का? म्हणताच राज्यमंत्री यानी परत दिलगिरी व्यक़्त केली,या बैठकीचे अधक्ष राज्यमंत्री असताना समाधान न झाल्याने उपस्थीत पत्रकारांनी जिल्हाधिकारयाचा धिक्कार म्हणून घोषना देऊन सगळा परिसर दणाणून सोडला असता जिल्हाधिकारी यानी गपचुप आपल्या गाडीत बसुन निघुन जाणेच योग्य समजून ते निघुन गेले
'नेमके पत्रकारांचा काय त्रास सध्या जिल्हाधिकारी यांना होत आहे.का त्यांना जिल्ह्यातील पत्रकार नको आहेत?काही दिवसापूर्वी एका पत्रकार संघाच्या अध्यक्षावर कार्यवाही केली,कहीं चूकले असल्यास १००%कार्यवाही करावी परंतू मी पत्रकार आहे,सर नमस्कार असे म्हटल्यावर आपले कार्ड दाखवा असे म्हणत कार्यवाही केली.उलट त्यांना समजावून सांगीतले असते तरी ते समजले असते,त्यानंतर हि घटना म्हणजे अती झाले ,चक्क बाहेर जा म्हणने म्हणजे एक प्रकारची हूकूमतच जिल्ह्यामध्ये चालू आहे की काय? असा प्रश्न आता सर्व पत्रकारांच्या मनात निर्माण होत आहे.अशा प्रवृत्तिवर वेळीच बंधने नाही आली तर जिल्ह्यातीलच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रातील पत्रकारिता धोक्यात येवू शकते ,असे मत आता पत्रकार व्यक्त करताना दिसत आहेत.'