मानवत तालूका पत्रकार संघाने केला अनंता मोरे यांचा सत्कार
प्रतिनिधी/आयूब खान
मानवत येथील पत्रकार हफिज बागवाण यांचा भ्रमणध्वणी मानवत व्यापार पेठेत हरविला होता , तो गव्हा ता. सेलू येथील अनंत बाळासाहेब मोरे या होतकरू यूवकाला सापडला व मित्राच्या साह्याने मोबाईल मालक यांचा शोध घेऊन परत केल्याने आज मानवत तालूका पत्रकार संघाच्या वतीने स्वाभिमानी व होतकरू यूवक अनंत बाळासाहेब मोरे यांचा सत्कार तालूकाध्यक्ष राणा संजयसिंह नाईक यांच्या हस्ते सोशल डिस्टेशनची खबदारी ठेवून करण्यात आला या वेळी पत्रकार बांधव उपस्थीत होते.
सविस्तर वृत्त असे की , मानवत शहरातील पत्रकार हफिज बागवान यांचा भ्रममध्वनी , सामसंग या कंपनीचा हरविला होता. तर तो मोबाईल सेलू तालूक्यातील गव्हा येथील स्वाभिमानी यूवक अनंता बाळासाहेब मोरे यांना सापडला त्याने मित्राच्या साह्याने मोबाईल मालकाचा शोध घेऊन परत केला, त्यामळे स्वाभिमानी , तरूण युवकाचा आज मानवत तालूका पत्रकार संघाच्या वतीने तालूका अध्यक्ष राणा संजयसिंह नाईक यांच्या हस्ते शाल ,श्रीफळ व पूष्पहार घाऊन सत्कार करण्यात आला यावेळी मानवत तालूका पत्रकार संघाचे पदाधिकारी , भैय्यासाहेब गायकवाड , ईरफान बागवान ,हाफिज बागवान , अनिल चव्हाण, लालूभाई माॅक्यानीक , मन्नूभाई शेख , अय्युब बागवान , बाळासाहेब लोखंडे आदीसह नागरीक या वेळी उपस्थीत होते.