किल्ले मच्छिंद्र गड येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव दोनच युवकांनी केला साजरा
सांगली/ प्रतिनिधी/ एकनाथ कांबळे
वाळवा तालुक्यातील किल्ले मच्छिंद्र गड येथे विश्वरत्न ,विश्वभुषण, बोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साजरा करण्यात आला आहे यावेळी सर्व बांधवांनी आपले घरीच राहून जयंती साजरी केली आहे भारत सरकारने दिलेल्या नियमांचे पालन करत तथा सांगली जिल्हा पोलिस प्रमुख पदाधिकारी व वाळवा तालुका पोलिस पदाधिकारी यांच्या वतीने दिलेल्या नियमांचे पालन करत किल्ले मच्छिंद्र गड येथील बौद्ध विहार मध्ये बुद्धाच्या मुर्तीस व बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुर्तीस पुष्पहार घालून व मेनबत्ती प्रज्वलीत करुन बुद्ध वंदना करून शासनाने लागु केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत जयंती उत्सव साजरा केला आहे!
Tags:
SANGLI