Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

लातूर जिल्ह्यातील दारू विक्री व इतर अवैध धंदे बंद करून सबंधीत भ्रष्ट पोलिसांना निलंबीत करा

 


लातूर जिल्ह्यातील दारू विक्री व इतर अवैध धंदे बंद करून सबंधीत भ्रष्ट पोलिसांना निलंबीत करा-  माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर


लातूर/प्रतिनिधी
गत अनेक महिन्यापासून लातूर तालुक्यासहीत पुर्ण लातूर जिल्ह्यात ग्रामीण भागातील गावात विनापरवाना अवैध दारू विक्री मटका, जुगार,चरस आदी धंदे सर्रासपणे चालू आहेत. त्यामुळे ग्रामीण व शहरी भागातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात जाऊन दारू या व्यसनामुळे कौटुंबिक वाद निर्माण होत असून अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. या संबंधित बाबीकडे जिल्हा प्रशासन व पोलिस विभागाकडून डोळेझाक होत असल्याने वांजरखेडा प्रकरणी सदर पोलिसांना निलंबीत करून हे अवैध धंदे बंद करण्याची मागणी लोकनेते माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी राज्याचे गृहमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हा पोलिस अधिक्षक,लातूूर यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
सदरील प्रकार सध्याच्या कोरूना संसर्गजन्य या लॉकडाऊन काळात तरी मोठ्या प्रमाणात चालत असल्याने शहर व ग्रामीण भागातील जनतेचे जनजीवन बिघडत आहे. या गंभीर बाबीकडे आपण गांभीर्याने पहावे त्याचबरोबर लातूर शहरातील व ग्रामीण भागातील  मटका,जुगार, गांजा मोठ्या प्रमाणावर चालू असल्याने शहरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून लातूर तालुक्यातील अनेक गावातील महिला भगिनीचे या अवैध धंदे व दारू विक्रीमुळे त्यांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. या अवैध दारूचे उदाहरण द्यावयाचे झाल्यास लातूर तालुक्यातील वांजरखेडा तांडा येथे हातभट्टीचा व्यवसाय जोरात आहे. आणि सध्या त लॉकडाऊनमुळे हाभट्टी वाल्यांच्या व्यवसाय चांगलाच तेजीत चालू आहे. असाच एक हातभट्टी विक्रेता बालाजी चव्हाण हा मोठ्या प्रमाणावर हातभट्टी दारू विकतो, असे वांजरखेडा तांडा येथील सरपंच सौ.रेणुका लक्ष्मण चव्हाण यांचे पती लक्ष्मण परसराम चव्हाण यांनी गातेगाव पोलिसांना माहिती दिली. त्या माहितीच्या आधारे चार पोलिस वांजरखेडा तांडा येथे पाहचले त्यांनी दारूवाल्या घराची झडती घेतली. व दारू वाल्यांना पोलिस गाडीत बसा असे बजावले. परंतु दारू विक्रेता गाडीत बसलाच नाही. उलट त्याने पोलिसासमोरच सरपंच पतीला अगोदर शिवीगाळ केली व नंतर काठीने डोके फोडले. परंतु पोलिस मात्र बघ्याची भूमिका घेत उभे राहिले. शेवटी गावकर्‍यांच्या व जमलेल्या जमावाच्या आग्रहास्तव पोलिसांनी दारूवाल्यांना गाडीत बसवून पोलिस वाल्याला घेवून गेले. अशाच प्रकारे बसवेश्‍वर चौक पोलिस चौकीपासून 100 फुटावर जनता दरबार नावाखाली मटका व जुगार खुलेआम जवळच्या इमारतीत चालु असतो, ते त्त्वरीत कार्यवाही करून अवैध व्यवहार बंद करावे, अशी आग्रही मागणी करून
अशा प्रकरणात मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून या सर्व गंभीर प्रकरणावर वचक बसवावा व सर्वच अवैध धंदे कामयचे या लॉकडाऊन काळात बंद करण्याचा आदेश पारीत करावा अशी आग्रहाची मागणीही शेवटी निवेदनाद्वारे केली आहे.


Previous Post Next Post