पत्रकार रवींद्र जगताप यांच्या आकस्मित निधनाचे वृत्त धक्कादायक आणि दुःखद असल्याची पालकमंत्री देशमुख यांची प्रतिक्रिया
लातूर ( प्रतिनिधी ): ज्येष्ठ पत्रकार रवींद्र जगताप यांच्या आकस्मित निधनाचे वृत्त धक्कादायक आणि दुःखद आहे अशी प्रतिक्रिया राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिककार्य मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी व्यक्त केली आहे.
पत्रकारिता क्षेत्रात नव-नवे प्रयोग करणारे रवींद्र जगताप यांचा साहित्य, सांस्कृतिक तसेच सामाजिक क्षेत्रातही मोठा वावर होता. त्यांच्या अचानक जाण्यामुळे लातूरच्या या सर्व क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे असेही पालकमंत्री देशमुख यांनी म्हटले आहे . जगताप परिवाराच्या दुःखात आपण सहभागी असून या परिवाराला हे दुःख सहन करण्याची ईश्वराने शक्ती प्रदान करावी अशी आपण प्रार्थना करत असल्याचे सांगून रवींद्र जगताप यांना त्यांनी शोकसंदेशाद्वारे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.