शिवभोजन थाळी चा लाभ घेतला धनदांडग्यांनी, गरीब मात्र रस्त्यावरच
उदगीर/प्रतिनिधी/डि.के.उजळंबकर
राज्य शासनाच्या शिवभोजन थाळी चा शुभारंभ दोनदिवसांपूर्वी राज्यमंत्री संजय बनसोडे आणि जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांच्या हस्ते नगरपरिषदेच्या मागील बाजूस करण्यात आला होता,त्या मध्ये पत्रकारांसोबत वाद ही झाला होता याच शिवभोजन थाळी चा अस्वाद उदगीर शहरातील नामांकित धनदांडग्यांनी घेत एक प्रकारे या योजनेची थट्टा केल्याचे दिसून येत असून गरिब जनता मात्र पैसे अभावी रस्त्यावर कोणी काही देतय का? याकडे चातक पक्षाप्रमाणे लक्ष लावत असून अशी दैनीय अवस्था या ठिकाणी पाहावयास मिळत आहे.
एकीकडे संचारबंदी असल्यामूळे गोरगरीब नागरीक रोडवर येण्यासाठी घाबरत आहेत. मात्र ज्यांना या शिवभोजन थाळीचा लाभ मिळावा हा हेतू होता तो मात्र संचारबंदीमुळे मिळत नसल्याचे विदारक चित्र या ठिकाणी पाहावयास मिळत आहे. ज्यांचे पोट हतावर आहे असे कामगार मजूर गरीब जनता नगर पालिकेचे पाणी पिऊन दिवस काढत आहेत. खरोखरच ज्यांना या शिवभोजन थाळीचा लाभ मिळावा ते मात्र वंचित राहल्याने शहरातील उद्योजक धनाढ्य लोक मात्र गरीबा ची आव दाखवत शिवभोजन थाळीचा अस्वाद घेत एक प्रकारे गरीबांची थट्टा करत असल्याचे दिसून येत आहे.तर राज्यमंत्री जिल्हाधिकारी पोलीस प्रशासन यांनी संचारबंदीचा नियम धाब्यावर बसवून केवळ प्रसिद्ध साठी शिवभोजन थाळीचा शुभारंभ केला असल्याची जोरदार चर्चा सध्या उदगीर शहरात चालू आहे.
यावर गरिब जनता मात्र घरीच पाणी पिऊन दिवस काढत आहेत.