वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज हुडे यांचे दुःखद निधन
उदगीर(प्रतिनिधी):-
ग्रामीण रुग्णालय,देवणी येथे वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत असलेले कवठाळा येथील सुपुत्र डॉ.मनोज हुडे यांचे काल अपघातामुळे दुःखद निधन झाले.
देवणी येथे आपली वैद्यकीय सेवा बजावून रात्री उदगीरला येत असताना येनकी क्रॉस येथे मोटर सायकल खाली गेल्यामुळे हादुर्देवी अपघात झाला.
अन्य शासकीय यंत्रणे प्रमाणे पुर्णतः सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून डाॅ.मनोज हुडे सुद्धा वैद्यकीय(आरोग्य)अधिकारी म्हणून रात्रंदिवस अगदी सकारात्मक पद्धतीने व झपाटल्याप्रमाणे कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटात सुद्धा नेहमी प्रमाणेच कोणत्याही परिस्थितीत न डगमगता व खचुन न जाता धिरोद्त्तपणे काम करत असत.
कर्तव्यदक्ष,प्रामाणिक, कार्यक्षम,मनमिळावू व तल्लख बुद्धीच्या या वैद्यकीय अधिकाऱ्याचा असा दुर्देवी अंत झाल्यामुळे परिसरामध्ये शोक व हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या अकाली निधनाबद्दल सर्व नातेवाईक; आरोग्य प्रशासन,लातूर; ग्रामीण रुग्णालय,देवणी; सामान्य रुग्णालय,उदगीर आणि तसेच उदगीर डॉक्टर्स असोसिएशन; आय.एम.ए,उदगीर;निमा,उदगीर; आय.डी.ए.,उदगीर व होमिओपॅथी असोसिएशन,उदगीर यांच्या वतीने श्रद्धांजली व शोक व्यक्त करण्यात येत आहे.