सोशल मीडियावरील कमेंटबद्दल शिवप्रतिष्ठानच्या धारकर्याला केलेल्या अन्याय्य मारहाणीचा हिंदु जनजागृती समितीच्या वतीने तीव्र निषेध
देशभरात कोरोनाचे संकट वाढत आहे. महाराष्ट्रात तर या संकटाने रौद्र रूप धारण केले आहे. राज्यात अशी स्थिती असताना राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविषयी सोशल मीडियावर एक पोस्ट केल्याबद्दल शिवप्रतिष्ठानचे धारकरी श्री. अनंत करमुसे यांना बेकायदेशीरपणे आणि निर्घृण मारहाण करण्यात आली. हे अतिशय निंदनीय आहे. हिंदु जनजागृती समिती याचा तीव्र निषेध करते.
भारतात संविधानाच्या आधारे कारभार चालतो कि गुंडगिरीने, हा प्रश्नच निर्माण झाला आहे. ज्यांनी संविधानाच्या रक्षणाची शपथ घेतली आहे, तेच सर्वसामान्य नागरिकांना अशी बेदम मारहाण करत असतील, तर सामान्य जनतेने कोणाकडून अपेक्षा ठेवावी ? सध्या देशभरात ‘कोरोना’मुळे संकट ओढावल्याने अनेक गोष्टींवर निर्बंध आहेत, त्यामुळे या विषयावर मोर्चा किंवा आंदोलन केले गेले नाही. तरी राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांनी या प्रकरणी त्वरित दखल घेऊन सर्व दोषींवर कारवाई करावी, अशी आमची मुख्यमंत्र्यांना विनंती आहे.असे निवेदनात सांगीतले आहे
*श्री. सुनील घनवट*
राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती,
महाराष्ट्र आणि छत्तीसगढ.
संपर्क : 7020383264