Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

पालघर प्रकरणी गृहमंत्र्यांची हकालपट्टी करा

 


पालघर प्रकरणी गृहमंत्र्यांची हकालपट्टी करा 


शहर भाजपाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

 

लातूर /प्रतिनिधी :पालघर जिल्ह्यात पोलिसांच्या साक्षीने साधूंची हत्या करण्यात आली . या प्रकरणी दोषींवर तात्काळ कारवाई करावी , या प्रकरणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी शहर भाजपाच्या वतीने करण्यात आली आहे. भाजपाच्या वतीने यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. 

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून मॉबलीचिंगच्या घटना वाढत आहेत.या सरकारमध्ये मंत्र्याच्या  बंगल्यावर नेऊन कार्यकर्त्याला मारहाणीचे प्रकार घडले आहेत. कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असून संचारबंदी असतानाही बांद्रा येथे हजारो लोकांचा जमाव जमण्यासारख्या घटना घडल्या आहेत. या सर्व प्रकारांना गृहमंत्री अनिल देशमुख यांची कार्यपद्धती कारणीभूत ठरत आहे.त्यामुळे त्यांची मंत्रिमंडळातून हाकालपट्टी  करून पालघर प्रकरणाची योग्य चौकशी करावी.दोषींवर कारवाई करावी.मारहाण प्रकरणी  मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा द्यावा ,आदी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत . 

या निवेदनावर शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे , दिग्विजय काथवटे , मनीष बंडेवार , शिरीष कुलकर्णी , सभापती दीपक मठपती , बाळासाहेब शिंदे , सभापती मंगेश बिराजदार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत .

Previous Post Next Post