Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

आ.धिरज विलासराव देशमुख यांच्या कडून लातूर ग्रामीण मतदार संघात अत्यावश्यक सेवा देणा-यांना सुरक्षा किटचे वाटप

 


आ.धिरज विलासराव देशमुख यांच्या कडून लातूर ग्रामीण मतदार संघात अत्यावश्यक सेवा देणा-यांना
सुरक्षा किटचे वाटप


लातूर:- (दि 6 एप्रिल)
जगभारात सध्या कोरोना विषाणूमुळे चिंतेचे वातावरण आहे. प्रत्येक जण कोरोना विरूध्द लढा  देत आहे. त्या लढाईस अधिक बळ देण्यासाठी लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यानी स्वखर्चाने लातूर ग्रामीण मतदार संघातील रेणापूर,लातूर व औसा येथील ग्रामीण रुग्णालय,प्राथमिक आरोग्य केंद्रातील  डॉक्टर,नर्स,तलाठी, ग्रामसेवक, स्वच्छता कर्मचारी,अंगणवाडी सेविका,आशा वर्कर,आरोग्य केंद्राचे कर्मचारी यांच्या सह पोलिस विभागातील अधिकारी,कर्मचारी यांना कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा देत असताना त्यांची सुरक्षा व्हावी या हेतूने सदरील सुरक्षा कीट पुरविण्यात आले आहेत. लोकप्रतिनिधी या नात्याने आ.धिरज विलासराव देशमुख यांनी स्वखर्चाने अत्याधुनिक सुरक्षा कीट उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामीण भागातील वैद्यकीय व पोलिस प्रशासना कडून आभार व्यक्त करण्यात आले.

 कोरोना आजार मोठ्या प्रमाणात उग्र स्वरूप धारण करत आहे. अशावेळी वैद्यकीय सेवा देणारे व पोलीस यंत्रणेतील सर्व मंडळी स्वतःचा जीव धोक्यात घालून समाजाची अविरत सेवा करत आहेत. अशावेळी लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांची काळजी घेणे या कर्तव्य भावनेतून आ. धिरज विलासराव देशमुख यांनी सुरक्षा किट पुरवले आहेत. या किट मध्ये पी.पी.ई.कीट ( डॉक्टरांना व्यक्तिगत संरक्षण करणारा पेहराव) , एन९५ मास्क, ट्रापल लेयर मास्क, कॅप, स्टरायिल ग्लोव्हज, संशयित रुग्णांचा ताप मोजण्यासाठी इन्फ्रारेड थरमामीटर व सॅनिटाईजरसह इतर आवश्यक दर्जेदार उपकरणांचा समावेश आहे. लातूर ग्रामीण मतदारसंघाच्या लातूर, औसा व रेणापूर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय रेणापूर, मुरुड, उजनी, प्राथमिक आरोग्य केंद्र निवळी, चिखुर्डा, बोरी, चिंचोली ब, जवळा, तांदुळजा, गंगापूर, भातांगळी, खरोळा, पोहरेगाव, कारेपूर, बिटरगाव, पानगाव, भादा, पोलीस स्टेशन मुरुड, रेणापूर, गातेगाव, भादा, लातूर ग्रामीण, लातूर एम.आय.डी.सी या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते, साखर कारखान्याचे चेअरमन , व्हा. चेअरमन, संचालक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ठिकठिकाणी सदरील सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले


Previous Post Next Post