Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

आज लातूर न्यूज वेब चॅनलने संपादक रवींद्र जगताप याचे दु:खद निधन

 


आज लातूर  न्यूज वेब चॅनलने संपादक रवींद्र जगताप याचे दु:खद निधन


लातूर:(प्रतिनिधी) येथील आज लातूर या वेब पोर्टल न्यूज चॅनलने संस्थापक संपादक रवींद्र भगवानराव जगताप याचे आज निधन झाले.काही महिन्या पासून ते विविध आजाराशी झुंजत होते.आज सायंकाळी लातुरात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली ते ५३ वर्षाचे होते.
लातूर शहरातील सांस्कृतिक क्षेत्राशी ते जोडले गेले होते.लातूरच्या गावभागात असताना त्यांनी आपल्या महाविधालयीन जीवनात नाट्य चळवळ उभीकेली पडघम नावाने त्यांनी सामाजिक विषयावर विविध नाटके सादर केली.शिवाय दैनिक एकमत मध्येही त्यांनी वृत्तसंपादक म्हणून अनेक वर्षे काम केले.सहारा समय या राष्ट्रीय हिंदी चँनलसाठी साठी त्यांनी लातूर जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून काम पाहिले शिवाय नेटवाणी,संवाद एस एम एस न्यूज सेवा आश्या विविध नव्यांनव्या माध्यमाची सुरुवात त्यांनी लातूर येथे केली.१५ वर्षा पूर्वी काढलेल्या आज लातूर या त्याच्या वेब न्यूज चॅनलला खुप लोकप्रियता मिळाली त्याचे देशात आणि विदेशात सबस्क्रायबर निर्माण झाले. त्यांना असणारा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव आणि नाविन्याची असणारी आवड यामुळे त्यांचे वेब चॅनल खूप लोकप्रिय ठरले होते. लातुरातील सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रासह राजकीय क्षेत्राची इत्यंभूत माहिती देणारे वेब चैनल म्हणून लातुरातील जगभर पसरलेल्या लातूरकरांनी आज लातूर या वेब न्यूजला पसंती दिली होती.
रवींद्र जगताप यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी, भाऊ असा मोठा परिवार आहे.


Previous Post Next Post