Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

उस तोडणी मजूराचा दिड वर्षीच्या मुलाचा आरोग्य विभागाच्या गाडीखाली सापडून दुर्दैवी अंत

 


उस तोडणी मजूराचा दिड वर्षीच्या मुलाचा आरोग्य विभागाच्या गाडीखाली सापडून दुर्दैवी अंत


सांगली/ प्रतिनिधी/ एकनाथ कांबळे
य.मो.कॄष्णा सह.साखर कारखाना गळित हंगामी ऊसतोड मजूर आलेले आहेत उस तोडणी बंद झालेने ते आपणास तळमारून राहणे साठी दिलेल्या जागेवर च झोपडीत राहत आहेत परंतू गावाकडे परत जावे तर पोलिसांचा बंदोबस्त जागेवर राहायचं तर खायचं काय एक किलो तांदूळ आणून शिजवून खायचे तर पैसा नाही या ठिकाणी एकूण ६०उसतोड मजूर दातांचे पाणी गिळत रस्त्याच्या कडेला बसून राहिले आहेत आज याच कुटुंबातील एका *दोन वर्षांच्या लहान मुलाचा दुर्दैवी अंत झाला आहे* रेठरे बुद्रूक येथील शासकीय आरोग्य विभागाच्या टाटा सुमो गाडी चालकाचा अचानक ताबा सुटल्याने रस्त्याकडेलाच वास्तव्यास असणाऱ्या ऊसतोड मजुरांच्या मुलाचा दुर्दैवी अपघात झाला आणि तो लहान मुलगा लावा संतोष काळे वय दोन हे बाळ जागिच मरण पावले आहे हा अपघात आज रोजी ठिक चार वाजता झाला आहे जुळेवाडी ग्रामपंचायतीच्या समोरून भरधाव वेगाने टाटा सुमो गाडी MHC 50-9902 या पांढ-या रंगाच्या गाडी खाली सापडून दुर्दैवी अंत झाला आहे पोलिस प्रशासन यांच्या कडून मिळालेल्या माहितीनुसार हे सर्व ऊसतोड मजूर ता.कळब जिल्हा उस्मानाबाद येथील आहेत


Previous Post Next Post