सीमाभागातील श्रीक्षेत्र चाळकापूर येथे हनुमानांचे जागृत देवस्थान
श्री हनुमान जयंती विशेष
उदगीर/प्रतिनिधि/ डि.के.उजळंबकर
विविध रूपे घेणारे अशाच श्री हनुमान जागृत देवस्थान वसलेले आहे ते कर्नाटक राज्यातील चाळकापूर याठिकाणी भाविक नवसाला पावणारे मंदिर म्हणून बारामहिने गर्दी करतात. या मंदिरात सकाळी श्री हनुमानांचे बाल रूप दुपारच्या सुमारास युवक रूप व सायंकाळच्या सुमारास वृध्द रूपे असे दर्शन या ठिकाणी मिळत असल्याचे भाविक अख्ययिका सांगतात. महाराष्ट्रातून गोदावरी हि नदी कर्नाटकराज्यात जाते. सदर नदी ही चाळकापूर जवळ असलेल्या नारंजा नदीला जोडते. याच ठिकाणी श्री हनुमानांचे भव्य मंदिर आहे. बिदर जिल्हयातील भालकी तालुक्यात चाळकापूर हे गाव आहे. सदर गाव छोटेसे असून गाव फार सुदंर आहे. या गावाला एक वेगळा इतिहास आहे. या गावालगत एक नदी असून त्यानदीचे नाव हे नारांचा नदी आहे. सदर नदी ही गोदावरी नदीसोबत जोडली जाते. चाळका हे एका देवीचे नाव आहे. जी देवी सदा पर्वतावर राहते जे की चाळकापूर जवळ आहे. याच पर्वताला संजीवनी पर्वत म्हणून संबोधले जाते. याच गावात श्रीरामांचे व श्रीहनुमानांचे भव्य मंदिर आहे. चाळका देवीचे सदैव वास्तव्य या ठिकाणी असल्याने या गावाला चाळकापूर हे नाव पडले. याठिकाणी विविध रूपे धारण करणारे श्री हनुमानांचे मंदिर असल्याने या गावाला एक इतिहास आहे. या ठिकाणी हनुमानांचे विविध रूपांचे दर्शन घेण्यासाठी भाविक दिवसभर मुक्कामी राहातात. सकाळच्या सुमारास या मंदिरात श्री हनुमानांचे बालरूप दुपारी युवक रूप व सांयकाळी वृध्द हनुमानांचे रूप पाहण्यासाठी भाविक एकच गर्दी करतात. या ठिकाणी वर्षातून दोन वेळा भव्य जत्रा भरते. याच मंदिरात प्रतिदिन कूंकमपुजा, अंलकारपुजा व गंधअलंकार पुजा नचुकता होत असते. भालकी तालुक्यातील चाळकापूर याठिकाणी श्रीहनुमान जयंती निमित्य भाविकांची तोबा गर्दी असते. नवसाला पावणारा श्री हनुमान मंदिर म्हणून भाविक याठिकाणी मोठया प्रमाणात ये-जा करतात. या मंदिरा शेजारी संजीवनी पर्वत असल्याने याठिकाणी ज्यावेळी रामायाणात लक्ष्मणाला युध्दाप्रसंगी लक्ष्मणशक्ती लागते त्यावेळी संजीवनी बेटावरून संजीवनी हि वनस्पती श्रीहनुमाने आणली असल्याचे सुध्दा या ठिकाणी इतिहासात नमूद आहेत. चाळकापूर हे गाव पर्वत रांगेत वसले असल्याने याठिकाणी पर्यटक निर्सगाचा अनमोल नजराणा पाहण्यासाठी व श्रीहनुमानांचे दर्शन घेण्यासाठी वर्षभर गर्दी करतात.