किल्ले मच्छिंद्र गड येथील श्रीक्षेत्र मच्छिंद्र नाथ यात्रा कोरोणा विषाणू फैलाव रोखण्यासाठी रद्द करण्यात आली आहे
सांगली/ प्रतिनिधी/ एकनाथ कांबळे
वाळवा तालुक्यातील किल्ले मच्छिंद्र गड येथील श्रीक्षेत्र मच्छिंद्र नाथ यात्रा दिनांक १३एप्रिल रोजी असून या पंचक्रोशीतील भावीभक्त मोठ्या संख्येने या यात्रेस उपस्थित असतात परंतु भारत सरकारने हाय अलर्ट जारी केला आहे त्यामुळे शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे व कोरोणा विषाणू पासून भावीभक्तांचे संरक्षण झाले पाहिजे यासाठी किल्ले मच्छिंद्र गड गावच्या वतीने यात्रा रद्द करणेचा निर्णय घेण्यात आला आहे तरी भावीभक्तानी याची नोंद घ्यावी व आपले सह कुटुंब सह परीवार आपले घरीच बसून राहिले पाहिजे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे यावेळी उपस्थित माण्यवर मा.गावच्या सरपंच सौ कोमल झेंडे व उपसरपंच मा. राहूलजी निकम सर व गावातील प्रमुख पदाधिकारी यांच्या वतीने श्री.मच्छिंद्रनाथ यात्रा उत्सव रद्द करण्यात आले चे घोषीत करण्यात आले आहे!