रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांना तात्काळ अन्न धान्य वाटप करा.
प्रतिनिधी/ लातूर,
कोरोनासारख्या महामारीने संपुर्ण जगामध्ये हाहाकार माजवला आहे यावर उपाय म्हणून भारत सरकार ने लॉक डाऊन करण्याचे आदेश दिले आहेत संपुर्ण भारत या लॉक डाऊन मध्ये सहभागी होत असताना त्यांच्या पोटापाण्याच्या प्रश्नाकडे प्रशासन दुर्लक्ष करत असताना दिसत आहे गेल्या सतरा ते अठरा दिवसांपासून सामान्य नागरिक आपला व्यवसाय काम धंदा बंद करून या महामारिला हद्दपार करण्यासाठी सरकार ने केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत आहेत पण सरकार यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून कधी थाळी तर कधी दिवा लावण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत पण सामान्य जनता रोजंदारीवर काम करते त्यांच्या पोटापाण्याच्या प्रश्नाकडे कोण लक्ष देणार हा प्रश्न निर्माण होतो रोजंदारीवर आपली उपजीविका भागवण्यासाठी रांञदिवस काम करणाऱ्या लोकांवर आज उपासमारीची वेळ आली आहे परंतू शासनाने कसली ही उपाय योजना न करता लॉकडाऊन कर्फ्यु लावण्याचं काम केले आहे ज्या पध्दतीने लॉक डाऊन केले आहे त्याच पध्दतीने गोर गरीब जनता रोजंदारीवर काम करून उदरनिर्वाह भागविते अशा लोकांना तात्काळ अन्न धान्य वाटप करण्यात यावे अशी मागणी *भिम आर्मी चे महाराष्ट्र प्रदेश संघटक अक्षय धावारे* यांनी केली आहे