Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

"आर्थिक मंदी व मानवाचे अस्तित्व" - डॉ दिपाली धाटे -घाडगे,पोलीस अधीक्षक,ना.ह.सं.औरंगाबाद.

 


"आर्थिक मंदी व मानवाचे अस्तित्व"-


डॉ दिपाली धाटे -घाडगे,पोलीस अधीक्षक,ना.ह.सं.औरंगाबाद.


अर्थशास्त्र या विषयाबद्दल मला फार काही कळत नाही...


असो...COVID-19 मुळे जगातील 
सगळी मानवजातचं lockdown झालीये अन lockdown असताना जाणवतंय की आपल्या गरजा किती कमी आहेत...
      गरजू लोकांना अन्न धान्याच्या किट वाटताना लक्षात आलं की खरं तर एवढीच आपली गरज...
उर्वरित सगळं शौक-ऐष- आराम यामध्ये मोडतं
आणि आपण आपले शौक-ऐष-आराम यांच्या सवयी इतक्या बिघडवून ठेवल्यात की त्याच आजकाल जीवनावश्यक बनल्यात...
      मी विचार करतेय की lockdown संपल्यानंतरही जर anti CORONA vaccine तयार झाली  नाही तर India मध्ये काय होईल याबाबत विचार केला तर घाबरायला होऊन जातं...
         सगळे म्हणतात की आर्थिक मंदी येईल,आपण 20-25 वर्ष मागे जाऊ विकास खुंटून जाईल... जाऊदेत खुंटून पण  लोकं किडा मुंगीसारखे मरून तर जाणार नाहीत ना.
आर्थिक भरभराट,विकास,महासत्ता,जगात सर्वश्रेष्ठ... या विशेषणांनी सध्या आपल्या सगळ्यांना-सगळ्यांना आंधळं करून टाकलंय आपल्याला दिसतच नाही या सगळ्यांचा परिणाम,हे सगळं मिळवण्यासाठी आपण काय गमावतो आहोत...
         पॅरिस करार आठवतोय? जागतिक तापमान 2 अंशाने वाढू न देण्याबाबत आहे या वर्षी ती वाढ पूर्ण होतीये आणि त्या कराराप्रमाणे जर जागतिक तापमान 2 अंश सेल्सियशने वाढले तर पुढील 30 वर्षात अख्खी मानवजात नष्ट होईल...
आपली पुढची पिढी कशी असेल ?? असेल का? असेल तर किती सुरक्षित असेल??हा विचारच आपण करीत नाहीत... आपण फक्त आणि फक्त स्वार्थी झालो आहोत.. मी आणि फक्त मीच... वर म्हणायला मोकळे " मी कोणासाठी करतोय/करतेय हे सगळं लेकराबळांसाठीच ना?" त्यांच्याच साठी दिवसरात्र राबतोय,कामावतोय,त्यांची काळजी आहे म्हणूनच ना.",
         पण अरे मित्रांनो मुलांसाठी लाखो-करोडो रुपये कमवून ठेवताना विचार करा की हे लाखो करोडो रुपये खर्च करण्यासाठी-त्यांचा उपभोग घेण्यासाठी त्यांचं अस्तित्व तर आपण पणाला लावत नाही ना?. आज त्याला सर्व सुख-सोयी- सुबत्ता देण्याच्या नादात त्याचा उद्या बर्बाद तर करत नाहीत ना आपण...
एका अर्थानं आपण सगळं करतोय ते बरोबरच आहे...उद्याच्या पिढीला पाणी-oxigen आपल्यासारखं free मध्ये थोडंच मिळणार आहे...
सोन्यापेक्षा जास्त किमती होतील मग हे सगळं विकत घ्यायला आम्ही कमावलेले करोडो रुपयेच कमी येतील नाही का?.
        आमच्या मुलांना AC शिवाय झोप येत नाही,without AC गाडीमध्ये मी कधीच travel करू शकत नाही अशी वाक्ये Sophasticated डॅडी- मम्मी-- specially मम्मीच्या तोंडातून नेहमी येतात.
         आमच्या प्रत्येक रूममध्ये Ac आहे Hall, Bed rooms, guest rooms... हे तर आज अत्यावश्यक सेवां इतक महत्वाच झालंय 
        मी तर वाट पाहतेय Toilet मध्ये AC घरोघरी कधी लागतील याची...
          अरे बाबांनो मुलांना आतापासून AC शिवाय झोपण्याची,non ac सार्वजनिक वाहनातून प्रवास करण्याची सवय लावली तर त्यांची मुलं free चा oxigen वापरू शकतील ... तरच आपली मानव जात वाचेल...
         का आपल्याला आपल्या पुढच्या पिढीचं अस्तित्व पणाला लावून देखील भरभराट हवीच आहे.??
             आता आर्थिक मंदी वगैरे मला फार जास्त कळत नाही पण जगातल्या लोकांचे प्राण वाचवण्यासाठी जर आर्थिक मंदीचा सामना करावा लागला तर प्राणाचं मोल कधीही जास्तच आहे ना?
आपण करूयात ना आर्थिक मंदीचा सामना सगळे मिळून काढुयात देशाला वर... काहीतरी निघेलच ना मार्ग..
          मी म्हणते 20-25 वर्ष  आपण मागे गेलोत तरी काय फरक पडेल???झालाच तर काही सकारात्मक बदल होईल...कारण 20वर्षापूर्वी आम्ही विशिमध्ये होतो तेव्हा पण आमचं व्यवस्थित च चालल होतं ना?
Global वॉर्मिग नव्हतं आतासारखं...
AC,fridge,4 wheeler शिवाय ही आम्ही खूप खुष होतो...शेकडो मजली 5 star flats नव्हते आमचे पण वाडा संस्कृतीत अगदी प्रेमाने रहात होतो.बुध्दीला काही गंज नव्हते चढले आमच्या laptop,mobile,--- नव्हते म्हणून...
       गणीताचे पाढे तोंडपाठ करून,बोटाच्या कांड्यावर बेरजा करून गावातल्या सार्वजनिक वाचनालयातले खूप -खूप पुस्तके वाचून,Answer keys & calculater शिवाय पुस्तकातून अभ्यास करुन, technology शिवाय शिक्षकांच्या छड्या हातावर खाऊन आम्ही 'ढ ' गोळे नाही राहिलो...आम्हीही आमच्या पद्धतीने थोडेफार यशस्वी झालोच ना... मग का घाबरतोय आपण 20-25 वर्ष मागे जायला???...
          आदिमानव जनावरांना मारुन जंगलात जाळावर भाजून खाऊन भूक भागवायचा अन आपण पुन्हा जनावरांना तंदूरमध्ये भाजूनच खात आहोत ना???
         एकच पोट भरतोय ना मानव अनादि काळापासून मग ते पोट भरण्यासाठी किती technology हव्यात आणखी ? नैसर्गिक गोडवा कंदमुळं, खजूर,उस यांच्यापासून गुळ, साखर,brown suger, suger free अन पुन्हा नैसर्गिक कंदमुळावर फिरुन आलोत ना?
         आता आणखी किती विकास करायचाय ते एकच पोट भरण्यासाठी...
झाड पाला गुंडाळून आपली लाज झाकतच होता ना आदिमानव,मग नैसर्गिक धागे,रेशीम, करत करत आपण पुन्हा fashion म्हणून का होईना  आदिमानवा इतकेच लाज झाकण्याईतकेच वस्र घालून उघडे  नागडे झलोतच ना?.
           नद्या,नाले,धबधबे यांच्या आश्रयाने पाण्यासाठी वस्ती करणारा आदिमानव व त्या नद्यांनाच बांध घालून,घरातच धबधबे,झरे केले व पुन्हा change म्हणून त्याच नद्या धबधब्यांकडेच फिरायला जातोय ना...
        पाणी पाणी म्हणून मरणारे वाळवंटातील जीव अन पाण्याचा अपव्यय करणारे आपण---- 
      करुयात विचार आपण सगळे पुन्हा नव्याने??
       जमेल हे आपल्याला, करायचा का प्रयत्न पुन्हा नव्याने???
         प्रत्येकाने थोडा-थोडा हातभार लावला तर सगळं होईल,जगतोच आहेत ना lockdown मध्ये साधं-सुधं-माणसासारखं ... तेच पुढेही चालू ठेवायचं  थोडं -फार ...कमी करायचा वापर गाड्यांचा ज्या प्रदूषण करतात.वापरु ना सायकल रोजची रोज...नाहीतर पायं आहेतच ना करुत त्यांचा वापर...
        प्रदूषण करणाऱ्या उद्योग-धंद्यांना आळा घालता येईल का बघुयात,जरी ते आर्थिक स्तर उंचावत असले तरी...    गरजच पडली दूरवर प्रवासाची तर सार्वजनिक वाहनं वापरावीत की पुन्हा, सर्व गोष्टी स्वतःचं status दाखवण्यासाठी नसतात,कधी-कधी माणूस म्हणूण स्वतःच status ठरवूयात ना..
        शिकवूयात स्वतःच्या लेकरांना network शिवायही कधीतरी जगायला,काही जगच बंद पडत नाही आपण ऑनलाइन नसलं तर हे दाखवून देउयात- पटवून देऊयात तरुणांना...
        थांबवूयात अतिक्रमणं करणं निसर्गावर...
       Holiday ला outing ला नैसर्गिक ठिकाणी जाऊ तो निसर्ग ही प्रदुषीत करण्याऐवजी घरीच जगुयात ना नैसर्गिक पद्धतीने...कशा बरं परत येतील मधमाशा-चिमण्या यावर जरा विचार करून प्रयत्न करूयात..नद्या,नाले,जंगले,समुद्र,महासागर,  
 हिमांचे आलय राहू देऊयात त्यांच्या मनाप्रमाणे त्यांच्या-त्यांच्या जागी.नको आपण चढाई करायला यांच्या अस्तित्वावर...
          आता आपल्या अस्तित्वाची लढाई आपल्याला आपल्या स्वतः शीच लढायची आहे...
       मी तर सुरुवात केलीये छोटीशी...
       घरातील AC बंद केलेत.कदाचित कायमचेच ...   घरातील सर्वांनीच support केलाय...
         पाण्याचा खूपच जपून वापर ... अन reuse... water purifire च waste पाणी भांडी-फरशी धुण्यासाठी अन फरशी- भांडे - कपडे  - धुण्याच उरलेलं पाणी झाडांसाठी...
        घरातलं wify आधीच बंद करून टाकलंय...
तो network rays चा अदृश्य विळखा जीव गुदमरून टाकतो...
       घरात ज्या ठिकाणी mobile network येत नाही ते ठिकाणं मला  आवडतातं शांत वाटतं अशा ठिकाणी
       अंगणातल्या बागेत भाजीपाला लावलाय,गोमूत्र अन उरलेलं अन्न खरकटे यांच खत.यामुळं फुलपाखरं पक्षी येताहेत.(  Actually lockdown मुळे माणसं घरात अन पक्षी प्राणी मुक्तपणे फिरताहेत )
     सायकल साफ करून ठेवलीये...
     बाहेर जावं लागलं तर आता सायकल वापरेल जास्तीत जास्त.
       प्लास्टिकचा वापर जास्तीत-जास्त थांबवतोय...
घरातील plastic,aluminium,nonstic च्या वस्तू शोधून-शोधून retired करतेय...
नवऱ्यापुढे प्रस्ताव ठेवलाय --- गावी 2-3 एकर शेती घेऊन तेथेच शेती पिकवून खाऊयात सेंद्रिय पद्धतीने.
पोटासाठीच जगतोय ना -- मग मोकळी हवा,शुद्ध वातावरण अन कॅन्सर देणाऱ्या pestisides पासून मुक्त स्वतःला हवं तसं तर जगता येईल...
         बघुयात कधी प्रस्ताव मंजूर होतो...
पण करेन नक्की... अन करतीये प्रयत्न माझ्या लेकरांना 'माणूस ' म्हणून नैसर्गिकपणे जगायला शिकवण्याचा...
         डॉ दिपाली धाटे-घाडगे.


Previous Post Next Post