Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

आयएमए’च्या अध्यक्षपदी डॉ.विश्‍वास कुलकर्णी

आयएमए’च्या अध्यक्षपदी डॉ.विश्‍वास कुलकर्णी


लातूर ः इंडियन मेडिकल असोसिएशन ही डॉक्टरांसाठी काम करणारी देशभरातील अग्रणी संस्था असून या संघटनेच्या लातूर जिल्हा शाखेच्या अध्यक्षपदी येथील सुप्रसिध्द मुत्ररोग तज्ज्ञ डॉ.विश्‍वास मधुकरराव कुलकर्णी यांची नुकतीच निवड करण्यात आली. त्यांनी आपल्या कार्याचा पदभारही स्वीकारला आहे.
‘आयएमए’ च्या सचिवपदी डॉ.चाँद पटेल यांची निवड करण्यात आली. संघटनेचे मावळते अध्यक्ष डॉ.अजय जाधव यांच्याकडून डॉ.विश्‍वास कुलकर्णी यांनी तर सचिव डॉ.संतोष डोपे यांच्याकडून डॉ.चाँद पटेल यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्विकारला असून संघटनेच्या कामाला धडाक्याने सुरूवातही केली आहे.
इंडीयन मेडीकल असोसिएशनच्या लातूर शाखेत तब्बल 650 डॉक्टर्स सभासद आहेत. या संघटनेत लातूर जिल्ह्यातील नामवंत डॉक्टर्संनी काम करून लातूरचे नावलौकीक वाढविले आहे. या संघटनेला वेगळी परंपरा आहे. त्या परंपरेला कुठलाही छेद न देता कोवीड-19 सारखे देशावर आलेले संकट लक्षात घेता सोशल डिस्टन्सींगचे पालन करून अनावश्यक खर्चाला फाटा देवून काम करण्यावर आपला भर राहील यासाठी संघटनेतील आतापर्यंतच्या सर्व मावळत्या अध्यक्षांचे आणि ज्येष्ठ सदस्यांचे मार्गदर्शन घेवून काम करणार आहे. ‘अशी प्रतिक्रिया आयएमएचे नवनिवार्चीत अध्यक्ष डॉ.विश्‍वास कुलकर्णी यांनी व्यक्त केली.’ यासाठी 24 तास सदैव आपल्यासाठी ........ अशी घोषणाही त्यांनी बोलतांना केली. संघटना वाढीसाठी आणि डॉक्टरांचे प्रलंबीत प्रश्‍न सोडविण्यासाठी डॉ.विश्‍वास कुलकर्णीसारख्या प्रामाणिक, निःष्कलंक व सामाजिक जाणीव जोपासणार्या एका सच्चा डॉक्टराची निवड झाल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात समाधान व्यक्त होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
‘आयएमए’ लातूर शाखेची कार्यकारणी अशी ः
डॉ.विश्‍वास कुलकर्णी(अध्यक्ष), डॉ.चाँद पटेल(सचिव), डॉ.अविनाश कुर्डुकर, डॉ.चेतन सारडा, डॉ.उमेश कानडे, डॉ.अशोक पोद्दार, डॉ.अरविंद भातांब्रे(उपाध्यक्ष), डॉ.देवाशीष रुईकर(कोषाध्यक्ष), डॉ.अमित उटीकर, डॉ.इंद्रजित लकडे, डॉ.चंद्रमोहन हरणे(सर्व सह सचिव), डॉ.कल्याण बरमदे (एएमएस विभाग प्रमुख), डॉ.अजय पुनपाळे (एएमएस सचिव), डॉ.एस.बी.सलगर (सीजीपी  विभाग प्रमुख), डॉ.अशोक चव्हाण (सीजीपी सचिव), डॉ.डी.एन.मंदाडे, डॉ.सुधीर फत्तेपुरकर, डॉ.मुकूंद भिसे(प्रांत प्रतिनिधी), डॉ.परमेश्‍वर सुर्यवंशी, डॉ.जितेन जैस्वाल, डॉ.रफीक शेख(केंद्रीय प्रतिनिधी), डॉ.शीतल अभंगे(शैक्षणिक विभाग समन्वयक), डॉ.आरती झंवर (खेळ विभाग समन्वयक), डॉ.वैशाली टेकाळे व डॉ.चेतन जाजू (सांस्कृतिक विभाग समन्वयक), डॉ.शाम सोमाणी, डॉ.महेंद्र सोनवणे, डॉ.राजकुमार दाताळ, व डॉ.संजय जगताप (नवनियुक्त कार्यकारिणी सदस्य).


 

Previous Post Next Post